नाराजी नाट्य दूर! शिवसेनेत गेलेले शहाबाज पंजाबी पुन्हा मनसेत येणार

पंजाबी यांनी काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता.
शहाबाज पंजाबी
शहाबाज पंजाबीसकाळ

पुणे : राज ठाकरे यांनी भोंग्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेनंतर नाराज झालेले मनसे वाहतूक सेनेचे माजी पुणे उपाध्यक्ष आणि मुस्लिम पदाधिकारी शहाबाज पंजाबी (Shahabaj Punjabi) पुन्हा मनसेत जाणार आहेत. भोंग्याबाबत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भूमिका मांडल्यानंतर पंजाबी यांनी काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. परंतु, आता राज ठाकरे यांच्या पुण्यातील उद्याच्या सभेदरम्यान, पंजाबी पुन्हा एकदा मनसेमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांचे ते खंदे समर्थक मानले जातात. (Shahabaj Punjabi News)

शहाबाज पंजाबी
आस्मानी संकट! आसाममध्ये 7 लाख बाधित तर, बिहारमध्ये 33 जणांचा मृत्यू

राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत मांडलेल्या भूमिकेचा विचार केल्यानंतर राज ठाकरे यांची भूमिका योग्य असल्याचे पंजाबी यांना वाटल्याने ते पुन्हा मनसेत जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत भूमिका जाहीर केल्यानंतर मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत पक्षाला रामराम केला होता. यामध्ये पंजाबी यांचादेखील समावेश होता. मनसेने हनुमान चालीसासंदर्भात आंदोलन जाहीर केल्यानंतर कोंढवा परिसरात हनुमान चालीसा लावू देणार नाही असे वक्तव्य शहाबाज पंजाबीने केले होते. मनसेने जर हनुमान चालीसा लावली, तर आमची मुले तयार आहेत, असे वक्तव्यही पंजाबीने केले होते.

शहाबाज पंजाबी
'आमच्यात थोडे मतभेद आहेत पण मनभेद नाही' : वसंत मोरे

कोण आहेत शहाबाज पंजाबी

पंजाबी हे मनसेचे (mns) पुणे शहराचे माजी अध्यक्ष वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक आहेत. शहबाज पंजाबी हे मनसे शहर वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत भूमिका जाहीर केल्यानंतर मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत पक्षाला रामराम केला होता. यामध्ये पंजाबी यांचादेखील समावेश होता. परंतु, आता पंजाबी यांना राज ठाकरे यांनी मांडलेली भूमिका योग्य असल्याची जाणीव झाली आहे. त्यानंतर उद्या राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शहाबाज पंजाबी पुन्हा एकदा मनसेमध्ये जाहीर प्रवेश करणार आहे. त्यामुळे भोंग्याच्या भूमिकेनंतर नाराज पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यात काही अंशी राज ठाकरे यांना यश अल्याचे दिसू लागले असून, आगामी काळत आणखी कोणाकोणाची नाराजी दूर करण्यात राज ठाकरे यशस्वी होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com