Shailaja Darade : दराडे मॅडमने सख्ख्या शेजाऱ्याला पण सोडले नाही..नोकरीचे आमिष दाखवून ३० लाख उकळले

शैलजा दराडे हिच्या सांगण्यावरून दादासाहेब दराडे व त्याचा मुलगा वीरधवल दादासाहेब दराडे यांनी डिसेंबर २०२२ पर्यंत रोख, बॅंक खात्यांमध्ये आणि ऑनलाइन पध्दतीने ३० लाख रूपये स्वीकारले.
darade
darade sakal

दौंड : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांनी त्यांच्या गावातील सख्खे शेजारी असणार्या कुटुंबातील सुशिक्षित बेरोजगार तरूणाला शिक्षण विभागात नोकरी देण्याचे आमिष दाखवून तब्बल तीस लाख रूपये उकळले आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंड पोलिस ठाण्यात शैलजा दराडे यांच्यासह एकूण तीन जणांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील ज्ञानदेव शिंदे ( मुळ रा. अकोले, ता. इंदापूर, सध्या रेल्वे शाळेजवळ, दौंड, जि. पुणे ) या पदवीधर बेरोजगार तरूणाने दौंड पोलिस ठाण्यात फसवणूक प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. सुनील शिंदे यांची अकोले गावात वडिलोपार्जित शेती असल्याने गावाकडे सतत ये - जा सुरू असून शैलजा दराडे या त्यांच्या शेजारी राहतात. नोकरीच्या शोधात असलेल्या सुनील शिंदे यास शैलजा दराडे यांचा भाऊ तथा शिक्षक दादासाहेब रामचंद्र दराडे याने बहीण शैलजा दराडे या शिक्षण विभागात उपायुक्त पदावर असल्याने पैसे घेऊन नोकरी लावण्याचे आमिष दाखविले.

शैलजा दराडे यांची पुणे येथील कार्यालयात २७ फेब्रुवारी २०२२ रोजी सुनील शिंदे यांनी भेट घेतली असता त्यांनी शिक्षण विभागातील कायमस्वरूपी नोकरीसाठी दादासाहेब दराडे याच्याकडे टप्प्याटप्याने तीस लाख रूपये जमा करण्यास सांगितले. त्यानुसार २२ ऑगस्ट २०२२ रोजी दौंड येथे येऊन दादासाहेब दराडे याने रोख आणि धनादेश स्वरूपात एकूण दहा लाख रूपये स्वीकारले.

darade
User Information : लोकांचे फोटो चोरून 'X' वर चाललाय हा कारभार! युजर्सची माहिती आलीय धोक्यात

शैलजा दराडे हिच्या सांगण्यावरून दादासाहेब दराडे व त्याचा मुलगा वीरधवल दादासाहेब दराडे यांनी डिसेंबर २०२२ पर्यंत रोख, बॅंक खात्यांमध्ये आणि ऑनलाइन पध्दतीने ३० लाख रूपये स्वीकारले. रक्कम दिल्यानंतरही नोकरी न लागल्याने आणि फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रक्कम परत मागितली असता दराडे भाऊ व बहिणीने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

darade
Vitamin H च्या कमतरतेमुळे शरीरात उरणार नाही एनर्जी, ही लक्षण दिसताच घ्या योग्य आहार

दौंड पोलिस ठाण्यात सुनील शिंदे यांच्या फिर्यादीनुसार १५ सप्टेंबर २०२३ रोजी शैलजा रामचंद्र दराडे (रा. अकोले, ता. इंदापूर, सध्या रा. पाषण, पुणे ) , दादासाहेब रामचंद्र दराडे व वीरधवल दादासाहेब दराडे (दोघे रा.अकोले, ता. इंदापूर) यांच्याविरूध्द फसवणूक आणि विश्वासघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

darade
J&K Anantnag Encounter: अनंतनागमध्ये चार दिवसांपासून गोळीबार सुरुच; आणखी एक जवान शहीद

हडपसर पोलिस ठाण्यात शैलजा दराडे व दादासाहेब दराडे यांच्यावर शासकीय नोकरीचे आमिष दाखवून ४४ जणांची ५ कोटी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी २२ फेब्रुवारी २०२३ रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर शासनाने शैलजा दराडे यांना २३ जुलै २०२३ रोजी निलंबित केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com