

अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप
युतीवर अखेर शिक्कामोर्तब
अंबरनाथ, ता. १४ : अंबरनाथ नगरपालिकेतील गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेना आणि भाजपने अधिकृत युतीची घोषणा केली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत शहर विकासासाठी एकत्र येत असल्याचे आज जाहीर केले; मात्र युतीची घोषणा झाली असली तरी उपनगराध्यक्षपद, सत्तावाटप आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या १२ नगरसेवकांच्या भवितव्यावर अद्याप पडदा कायम आहे.
नगरपालिकेत शिवसेनेकडे २८ नगरसेवकांचे बळ आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार नगरसेवक त्यांच्यासोबत असल्याने त्यांची ताकद ३२वर पोहोचली आहे. दुसरीकडे भाजपचे मूळ १५ आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले १२ असे मिळून भाजपची संख्या २७ आहे. निवडणुकीनंतर भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी सत्तास्थापनेचा प्रयत्न केला होता; मात्र राष्ट्रवादीचे सदाशिव पाटील यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले. नगराध्यक्ष भाजपचा आणि बहुमत शिवसेनेकडे असल्याने शहरातील अनेक विकासकामे गेल्या चार महिन्यांपासून रखडली आहेत. निर्णय प्रक्रियेत समन्वयाचा अभाव दिसून येत होता. अशा परिस्थितीत ‘विकास’ हा समान मुद्दा पुढे करत शिवसेनेने भाजपकडे युतीचा प्रस्ताव दिला. त्यानंतर वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्यानंतर अखेर दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.