पुणे : हरिश्चंद्री ग्रामस्थांचे शोले टाईप आंदोलन

पुणे : हरिश्चंद्री ग्रामस्थांचे शोले टाईप आंदोलन

नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावर वारंवार मागणी करूनही रस्ता पार करण्यासाठी भुयारी मार्ग होत नाही, यामुळे झालेल्या अपघातात अनेक नागरीकांना प्राण गमवावे लागले आहेत. पोलिस देखिल संबंधित अधिका-यांवर गुन्हा दाखल करत नाहीत. याचा निषेध करत हरिश्चंद्री (ता. भोर) येथील ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून उडी मारुन आत्महत्या करण्याचा निर्णय घेत आंदोलन केले. यामुळे पोलिस व प्रशासनाची धावपळ झाली.

महामार्गचे सहापदरीचे काम झाल्यावर हरिश्चंद्री गावच्या ग्रामस्थांना रस्तापार करण्यासाठी सुविधा उपलब्ध नाही. ग्रामस्थांची शेती रस्त्याच्या पलिकडे असल्याने धोकादायक पद्धतीने रस्ता पार करताना अपघात होऊन अनेकांचे प्राण गेले आहेत. या मुळे महामार्गावर भुयारी मार्ग होण्यासाठी ग्रामस्थांनी अत्ता पर्यंत अनेकदा निवेदने दिली आहेत. ३ जुन २०१९ रोजी भोर तहसिल कार्यालया समोर उपोषण देखिल करण्यात आले होते.

त्या वेळेस तोंडी आश्र्वासन देऊन एक वर्षाच्या आत भुयारी मार्ग होईल असे सांगितले होते मात्रमात्र वर्ष होऊन गेले तरी त्यावर कार्यवाही झाली नाही २०नोव्हेंबर रोजी पुन्हा एक व्यक्ती चा म्रुत्यु झाला यावेळी अपघातास जबाबदार झाल्या प्रकरणी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे परंतु त्या बाबत अद्याप निर्णय झाला नाही. शेवटी आज भोर तालुका प्रहार संघटनेचे अध्यक्ष संतोष मोहीते यांच्यासह ग्रामस्थ राम पाचकाळे, राम गाडे, राम पाचकाळे, शुभम गाडे, किशोर गाडे, पंकज गाडे, तुषार गाडे,
अमित पाचकाळे, सागर घोडके, अजिंक्य पाचकाळे,
लकी गाडे यांनी गावच्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान आंदोलनाची माहिती मिळताच महामार्ग प्राधिकरणाणाचे अधिकारी अनिल गोरड ठेकेदार कंपनी रिलायन्सचे राकेश कोळी, नायब तहसीलदार मनोहर पाटील यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन आंदोलन थांबवण्याची विनंती केली, मात्र आंदोलकांनी मागणी धुडकावली. यानंतर भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, पोलिस निरीक्षक विनायक वेताळ यांनी भेट देऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु सायंकाळ पर्यंत मार्ग निघाला नव्हता. या वेळी जिल्हा परिषद सदस्या शलाका कोंडे, हरिश्चंद्री गावच्या सरपंच भारती गाडे यांच्या सह ग्रामस्थ व महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com