बार दहापर्यंत; दुकाने सातलाच बंद

लक्ष्मीरोड - ऐन खरेदीच्या वेळीच सायंकाळी सातनंतर दुकाने बंद होत असल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. बुधवारी सायंकाळी ७. ४० मिनिटांनी काढलेले छायाचित्र.
लक्ष्मीरोड - ऐन खरेदीच्या वेळीच सायंकाळी सातनंतर दुकाने बंद होत असल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. बुधवारी सायंकाळी ७. ४० मिनिटांनी काढलेले छायाचित्र.

पुणे - हॉटेल्स, बार, मॉल रात्री दहापर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी मात्र, अन्य सर्व प्रकारची दुकाने सायंकाळी सातलाच बंद करायची, असे अजब फर्मान महापालिकेने काढल्याने त्यांच्या धोरणातील विसंगती उघड झाली आहे. याचा मोठा फटका व्यापाऱ्यांना बसत असल्याने ते हैराण झाले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नवरात्र, दसरा, दीपावली आदी सण उंबरठ्यावर असताना, महापालिकेच्या या निर्णयामुळे सुरू होत असलेल्या अर्थचक्राला खीळ बसत असल्याचे नागरिक, व्यापारी आणि त्यांच्या संघटनांचे म्हणणे आहे. कोरोनाचे संकट असल्यामुळे गर्दी होऊ नये म्हणून दुकाने सायंकाळी सातला बंद करायचा निर्णय घेतला आहे, असे महापालिका म्हणत आहे. हॉटेल, बार रात्री दहापर्यंत खुले असतील तर दुकानांना का बंदी, हा मुद्दा सध्या शहरात ऐरणीवर आला आहे.

नेमकी विसंगती काय ? 
हॉटेल आणि बार खुले करण्यास राज्य सरकारने ५ ऑक्‍टोबरपासून परवानगी दिली आहे. महापालिकेने त्यांना रात्री दहापर्यंत मंजुरी दिली आहे. मॉलमधील दुकानेही रात्री दहापर्यंत खुली ठेवता येतील, असे महापालिकेने म्हटले आहे. मात्र, किराणा माल, भाजीपाला, फळे, कपडे, सोने-चांदी, इलेक्‍ट्रिकल वस्तू, वाहनांचे सुटे भाग, जनरल स्टोअर्स आदी विविध प्रकारची दुकाने सायंकाळी सातपर्यंतच खुली ठेवण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे.

पुणे : बांधकाम व्यावसायिक खून प्रकरणी पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या!

सण उंबरठ्यावर, ग्राहक घरातच ! 
सध्या अधिक महिना सुरू आहे. त्यानिमित्ताने धार्मिक व्रतवैकल्ये होतात. तसेच १७ ऑक्‍टोबरपासून नवरात्र तर, २५ ऑक्‍टोबरला दसरा आहे. १४ नोव्हेंबरपासून दीपावली सुरू होत आहे. गेली सात महिने नागरिक घरातच होते. या सणांमुळे ते बाजारपेठेत येण्यास सुरवात झालेली असताना, दुकाने मात्र सायंकाळी सातलाच बंद करण्याच्या निर्णयामुळे ग्राहक, व्यापारी त्रस्त झाले आहेत. 

जनजीवन सुरळीत होण्याच्या दिशेने 
शासकीय आणि खासगी कार्यालयांत सध्या उपस्थिती वाढू लागली आहे. कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांचेही प्रमाण वाढू लागले आहे. लग्नसमारंभांनाही सुरवात झाली आहे. चित्रपटगृहे सुरू करण्यासही केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे जनजीवन सुरळीत होण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. 

प्रसिद्ध नृत्यांगणेनं २१ व्या वर्षी संपवलं जीवन; पुण्यात राहत्या घरी केली आत्महत्या

पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ॲड. फत्तेचंद रांका म्हणाले, ‘‘सणासुदीचे दिवस आता सुरू होत आहेत. त्यामुळे दुकानांची वेळ नेहमीप्रमाणे म्हणजेच रात्री साडेआठ ते नऊपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्याची गरज आहे. हॉटेल आणि बार खुले, दुकाने मात्र बंद, ही भूमिका योग्य आहे का ? या बाबत पालकमंत्री अजित पवार यांच्याशी व्यापारी महासंघ संपर्क साधून, निर्णय घेण्याची विनंती करणार आहे.’’

पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले, ‘‘सणांसाठी आपल्याकडे अगोदरच खरेदी होत असते. पुरेशी काळजी घेऊन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची अंमलबजावणी करूनच दुकाने खुली आहेत. ती ९ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्याची गरज आहे. वेळेची मर्यादा वाढविली तर, व्यापार वाढेल.’’

केंद्रीय मंत्री नितिन गडकरींचे खासदार डॉ. कोल्हे यांना पत्र, कारण...

कॉटनकिंगचे संचालक कौशिक मराठे म्हणाले, ‘‘नागरिक दिवसभर त्यांच्या नोकरी- व्यवसायात बिझी असतात. मात्र, सायंकाळी दोन तास वेळ वाढविली तर, त्यांना दिलासा मिळेल. हॉटेल, बारमधून कोरोना पसरत नाही आणि लहान-मोठ्या दुकानांतून पसरेल, असे महापालिकेला वाटते का ? योग्य खबरदारी घेऊन वेळ वाढविणे शक्‍य आहे.’’

महाराष्ट्र इलेक्‍ट्रॉनिक्‍सचे भागीदार गुरुप्रीत सिंग म्हणाले, ‘‘सगळ्या दुकानदारांना त्यांची आणि ग्राहकांची काळजी आहे. त्यामुळे सगळे काळजी घेतीलच. एक तर गेले सहा महिने जिकिरीचे गेले आहेत. आता वेळेच्या बंधनामुळे ग्राहकांनाही त्रास होत आहे.’’

महापौर म्हणतात ‘चर्चा करतो’ !
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘‘दुकाने बंद करण्याची वेळ वाढविण्याबाबत मी सकारात्मक आहे. परंतु, शहरातील परिस्थितीचा आढावा घ्यावा लागेल. या बाबत प्रशासनाशी चर्चा करून, लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल.’’

वाढीव वेळेची कारणे -
- हॉटेल्स, बार चालतात तर दुकाने का नाही ? 
- सणा-सुदीच्या दिवसांत, ग्राहकांनाही खरेदीसाठी वेळ वाढवून हवी 
- एकाच वेळी गर्दी होऊ नये म्हणून वेळ वाढविणे गरजेचे 

याकडे लक्ष हवे

  • हॉटेल्स, बार उशीरापर्यंत चालतात तर, दुकाने का नाही ? 
  • सणा-सुदीच्या दिवसांत, ग्राहकांनाही खरेदीसाठी वेळ वाढवून हवी 
  • एकाच वेळी गर्दी होऊ नये
  • म्हणून वेळ वाढविणे गरजेचे
  • रस्त्यावरील गर्दी नियंत्रणात राहाण्यासाठी वेळ एकच हवी
  • बाजारपेठेच्या अर्थचक्राला गती मिळेल

अशा फतव्यामुळे होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी कोणाची...? आपल्याला काय वाटते? आम्हाला जरूर कळवा. निवडक प्रतिसाद, सूचना ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होतील.
editor@esakal.com, Whatsapp : 9130088459 
सोशल मीडियावर प्रतिसाद कळवताना #OpenShops हॅशटॅग जरूर वापरा.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com