पुणेकरांनो इकडे लक्ष्य द्या; पुढील आदेश येईपर्यंत दुकाने राहणार बंद!

Pune-Shops
Pune-Shops

पुणे : कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पुण्यातील बाजारपेठ शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहे. गुरुवारी (ता. १९) घाऊक आणि किरकोळ संघटनची शिखर संघटना असलेल्या पुणे व्यापारी महासंघाच्या झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले. याबाबतची माहिती महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

व्यापारी महासंघाच्या या निर्णयामुळे शहरातील हजारो दुकाने बंद राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महासंघाने यापूर्वी तीन दिवस दुकाने बंद ठेवली होती. त्यानंतर आज विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि व्यापारी महासंघाचे पदाधिकाºयांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. यामध्ये पुढील आदेश येईपर्यंत दुकाने बंद राहण्याचा निर्णय झाला. बंदमधून जीवनावश्‍यक वस्तू आणि औषधांना वगळण्यात आले आहे. 

सराफ, होजिअरी, कापड, आॅटोमोबाईल, प्लायबुड, टिंबर, स्टेनलेस स्टील,नॉन फेरस, मेटल पेपर, प्लॅस्टिक, इलेक्‍ट्रिक ऍन्ड इलेक्‍ट्रॉनिक, मशिनरी व वेल्डींग, कॉम्प्युटर, टॉईज, वॉच, सायकल, केमिकल, रविवार पेठ, व्यापारी आदी संघटनांचे प्रतिनिधी या संघटनांचे सभासद आहेत.

सभेनंतर पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका , उपाध्यक्ष सुर्यकांत पाठक, रतन किराड, सुभाष संघवी, राजेश शहा , सचिव महेंद्र पितळीया, सहसचिव जयंत शेटे, हेमंत शहा, खजिनदार मनोज सारडा, अभय गाडगीळ यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. या बैठकीत पुणे शहर उपविभागात काही दाट वस्तीतील दुकाने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून ती दुकाने बंद राहण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याचे यावेळी आश्वासन दिले.

रिटर्न भरण्याची तारीख वाढवून देण्याची मागणी

जीएसटीचा भरणा करण्याची मुदत २० मार्च २०२० व रिटर्न दाखल करण्याची मुदत १० एप्रिल २०२० आहे; परंतु बंदमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे रक्कम व रिटर्न भरण्याचे शक्य नसल्याने त्याची मुदत वाढवून मिळाण्यासाठी जीएसटी कौन्सिल, अर्थमंत्री भारत सरकार यांना पुणे व्यापारी महासंघातर्फे विनंती करावी यास त्यांनी शिफारस करण्याचेही मान्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com