रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; कोरोनामुळे कॅन्सलेशन चार्जेस रद्द!

Pune-Railway-Station
Pune-Railway-Station

पुणे : कोरोनामुळे रद्द झालेल्या गाड्यांचे आरक्षण केलेल्या प्रवाशांना संबंधित तिकिटाचा 100 टक्के परवाता (रिफंड) देण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने जाहीर केले आहे. त्यातून कोणत्याची शुल्काची वजावट होणार नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

कोरोनामुळे घटलेली प्रवासी संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लांब पल्ल्याच्या 30 रेल्वेगाड्या 20 ते 31 मार्च दरम्यान रद्द केल्या आहेत. तसेच चार दिवसांपूर्वीच 23 गाड्याही रद्द केल्या आहेत. त्यात पुणे - मुंबई, पुणे- नागपूर, पुणे-भुसावळ, पुणे- सिकंदराबाद आदी मार्गांवरील गाड्यांचा समावेश आहे.

उन्हाळी सुट्यांचा हंगाम लक्षात घेऊन प्रवाशांनी या गाड्यांसाठी सुमारे दोन महिन्यांपूर्वीच आरक्षण केले होते. त्यामुळे या गाड्यांसाठी सध्या 'वेटिंग लिस्ट' होती. मात्र, कोरोनाचा संसर्ग बळावल्यामुळे प्रवाशांमध्ये घट झाली आहे. त्यामुळे रेल्वेने गेल्या आठ दिवसांत एकूण 53 गाड्या रद्द केल्या आहेत.

रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये आरक्षण केलेल्या प्रवाशांना तिकिटाचा 100 टक्के परतावा मिळणार आहे. त्यातून कोणतेही प्रशासकीय शुल्क (कॅन्सलेशन चार्जेस) कापले जाणार नाही. मात्र, ज्या गाड्यांची वाहतूक सुरू आहे, त्यात प्रवाशाने तिकिट रद्द करून परतावा मागितला तर, त्याला नियमाप्रमाणे शुल्क आकारून रक्कम परत मिळेल.

ज्या गाड्या रेल्वेने रद्द केल्या आहेत, त्यातून कॅन्सलेशन चार्जेस न कापता प्रवाशांना पूर्ण तिकिटाचा परतावा मिळणार आहे. ज्या प्रवाशांनी ऑनलाईन बुकींग केले होते, त्यांचा आयडी क्रमांक तपासून त्याच बॅंक खात्यावर रक्कम जमा करण्यात येईल, असे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी स्पष्ट केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com