शिवाजीनगर : शिरोंळेची पुन्हा मुसंडी; बहिरट यांना टाकले मागे | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

Election Results 2019 : चुरशीच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात पाचव्या फेरीअखेर भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे हे दोन हजार मतांनी आघाडीवर गेले आहेत. पहिल्या चार फेऱ्या काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट हे शिरोळे यांच्यापेक्षा आघाडीवर होते. पाचव्या फेरीनंतर भाजपने या मतदारसंघात आघाडीवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील चुरस वाढली आहे.

Vidhan Sabha 2019 : पुणे : चुरशीच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात पाचव्या फेरीअखेर भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे हे २४९० मतांनी आघाडीवर गेले आहेत. पहिल्या चार फेऱ्या काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट हे शिरोळे यांच्यापेक्षा आघाडीवर होते. पाचव्या फेरीनंतर भाजपने या मतदारसंघात आघाडीवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील चुरस वाढली आहे.

पुण्याच्या निकालाकडे राज्याचे लक्ष; या आहेत बिग फाईट! | Election Results 2019
 
पाचवी फेरीत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात उमेदवारांनी मिळवलेली मते.

सिद्धार्थ शिरोळे (भाजप) १४७१९
दत्ता बहिरट (काँग्रेस) १२२२९
अनिल कुर्हाडे (वंचित) ३८०८

या  मतदार संघातून दत्ता बहिरट यांनी पोस्टल मतमोजणीच्या पहिल्या फेरीत ३०८ मतांनी आघाडी घेतली होती तर  सिद्धार्थ शिरोळे हे पिछाडीवर होते. हे दोघेही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात यंदा प्रथमच उतरले आहेत. त्यामुळे यांच्यातील लढत कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.   

पुण्यात जमावबंदी; कोल्हापूरात मिरवणूकांना बंदी | Election Results 2019

.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Siddharth Shirole leading in Shivajinagar in maharashtra vidhan sabha relection results 2019