राज्यातील सहाशे महिलांनी ४४ बसची खरेदी करून दिल्या भाडेतत्त्वावर

PMPML
PMPML

राज्यातील सहाशे महिलांनी काढले १८ कोटींचे कर्ज, ४४ बसची खरेदी 
पुणे - राज्यातील विविध बचत गटांच्या सुमारे 600 सदस्य महिला कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढून, त्याद्वारे खरेदी केलेल्या बसगाड्या पीएमपी सारख्या एखाद्या परिवहन संस्थेला तब्बल सात वर्षांसाठी भाडेतत्त्वावर पुरवितात अन्‌ आपल्या आर्थिक उन्नतीचा मार्ग शोधतात. इतकंच नव्हे तर त्यांच्या बस आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील रस्त्यांवर धावू लागल्या आहेत. एरवी स्वप्नवत वाटणारा हा उपक्रम प्रत्यक्षात साकारला आहे. अन त्यातून अन्य बचत गटांनाही प्रेरणा मिळत आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एखाद्या सार्वजनिक परिवहन संस्थेला बचत गटांनी बस भाडेतत्त्वावर देण्याचा हा देशातील पहिलाच उपक्रम आहे. त्यासाठी राज्यातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, वाशीम जिल्ह्यांतील 43 बचत गट सक्रिय झाले आहेत. माजी सैनिकांच्या पत्नी, विधवा या केवळ गृहोद्योगांतच गुरफटलेल्या नाहीत तर, एखादी कंपनी उभारूनही त्या व्यावसायिक कंपन्यांशी स्पर्धा करू शकतात, हे विश्‍वयोद्धा शेतकरी मल्टीट्रेड प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे. या उपक्रमाचे शिल्पकार आहेत कंपनीचे अध्यक्ष आणि माजी सैनिक सुरेश गोडसे, कर्नल आर. आर. जाधव. 

पीएमपी भाडेतत्त्वावर बस घेणार, ही जाहिरात त्यांनी 3 वर्षांपूर्वी वाचली. पीएमपीच्या तत्कालीन अध्यक्षा नयना गुंडे यांना भेटून गोडसे व जाधव भेटले. यांनी त्यांना कल्पना सांगितली. भाडेतत्त्वावरील बस घेताना 10 टक्के आरक्षण बचत गटांसाठी ठेवण्याची तरतूद त्यांनी केली. 

बस भाडेतत्त्वावर पुरविण्याचा प्रकल्प आम्हाला पटला. म्हणूनच आमच्या गटातील 12 महिलांनी सुमारे 7 लाख रुपये उभे केले आणि बॅंकेच्या कर्जाद्वारे बस खरेदी केली. सुरवातीला कमी पैसे मिळाले तरी, उत्तरोत्तर ही रक्कम वाढणार आहे. त्यामुळे आम्हाला सलग सात वर्षे हमखास उत्पन्नाचे साधन मिळाले आहे. 
- मंगल देशपांडे, बचत गट प्रमुख, वाशीम

  • 600 - बचतगटातील एकूण महिला 
  • 44 - एकूण बस
  • 2 कोटी 74 लाख - स्वहिस्सा 
  • 18 कोटी रुपये कर्ज
  • 7 वर्षे - पीएमपीसोबतचा भाडेतत्वाचा करार

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com