
पुणे जिल्ह्यात अंगावर काटा आणणारी घटना घडली. जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे सहा महिन्याच्या बाळाचा ट्रॅक्टरच्या ट्रॉली खाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झालाय. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होतोय. (six month old child death rajgurunagar pune accident video goes viral )
एका ताज्या रिपोर्टनुसार आईवडिल सहा महिन्याच्या बाळाला घेऊन दवाखान्यात जात होते. मात्र वाटेत मागून येणाऱ्या ट्रक्टरने हलकी धडक दिली. यात बाळाचे आई वडील आणि बाळ गाडीवरुन खाली पडले. आईवडील सुखरुप होते मात्र बाळ चिरडले गेले.
सध्या पोलिस या घटनेचा तपास करत असून नेमकी चूक कोणाची हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. काहींनी तर चूक कोणाची सांगत रस्त्याच्या कडेला थांबलेल्या 3 पोरी मुळे हा अपघात घडला असे सांगितले तर काहींनी टू- व्हीलर नीट ट्रॅक्टरला ओव्हरटेक करू शकली नाही असेही म्हटले तर काही जणांनी म्हटले की ट्रॅक्टर पण वेगात होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.