पुणे जिल्ह्यात बसस्थानकांवर घुमणार 'बेटी बचावचा नारा'

Awareness by slogan of save Girl Child on the bus stand in Pune district
Awareness by slogan of save Girl Child on the bus stand in Pune district

पुणे : जिल्ह्यात दर हजारी पुरुषांमागील मुलींचे प्रमाण घटत आहे.
त्यामुळे मुलींच्या जन्माच्या स्वागतासाठी प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा
परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने पुढाकार घेतला आहे. यासाठी शहर व
जिल्ह्यातील बसस्थानकांवर जिंगल्सच्या माध्यमातून मुलगी वाचविण्याबाबत
जनजागृती केली जाणार आहे. यामुळे शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे
स्टेशन या तीनही बसस्थानकांसह जिल्ह्यातील प्रमुख नऊ बसस्थानकांवर आता
बेटी बचावचा नारा घुमणार आहे.

अक्षय कुमार वसवणार ट्रान्सजेंडर्ससाठी घरं!

या जिंगल्सच्या जोडीलाच बसस्थानकांवर आणि बसेसमध्ये जनजागृतीविषयक
स्टिकर्स आणि ऑटो रिक्षांवर भित्तीपत्रकांच्या माध्यमातून जनजागृती केली
जाणार आहे. या मोहिमेचे उद्‌घाटन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण
समितीच्या सभापती पूजा पारगे यांच्या हस्ते रविवारी (ता. 1) स्वारगेट
बसस्थानकांवर करण्यात आले. यावेळी महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य
कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय मुंडे, स्वारगेट बसस्थानकाच्या आगार
व्यवस्थापक स्वाती बांद्रे आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शहरी व ग्रामीण भागातील बसस्थानकांवर सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत या
जिंगल्स प्रसारित केल्या जाणार आहेत. दरम्यान, विभाग नियंत्रक यामिनी
जोशी आणि आगार व्यवस्थापक सचिन शिंदे यांच्या सहकार्याने शिवनेरी,
निमआराम आणि साध्या बसेसमध्येही हे स्टिकर्स लावण्यात आले आहेत. यावेळी
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे सर्व प्रकल्प अधिकारी, सहाय्यक प्रकल्प
अधिकारी आणि पर्यवेक्षिका उपस्थित होत्या.

लघुशंकेसाठी थांबले अन् 5 जणांसाठी टेम्पो ठरला कर्दनकाळ

सात तालुक्‍यात घटले प्रमाण
पुणे जिल्ह्यातील तेरापैकी सात तालुक्‍यांमध्ये दर हजारी मुलांमागील
मुलींच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. काही तालुक्‍यात हेच प्रमाण
साडेआठशेच्या आत आले आहे. सध्या पुणे जिल्ह्याचे मुलींचे सरासरी प्रमाण
हे 913 इतके खाली आले आहे. हेच प्रमाण 2011 च्या जनगणनेनुसार 947 एवढे
होते. या पार्श्‍वभूमीवर मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध माध्यमातून
जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बसस्थानकांवर जिंगल्स
सुरू करण्यात आल्याचे सभापती पूजा पारगे यांनी सांगितले. 

पुणे : एकतर्फी प्रेमातून त्याने तिच्यासमोरच झाडली गोळी...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com