मी दाऊद गँगशी कनेक्टेड आहे, प्रकरण महागात पडेल!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

लोढा मार्केट यार्ड पोलिसांकडे गेले. त्यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याऐवजी लोढा यांच्यापुढे प्रश्नांचा पाढा वाचला.

पुणे : लॉकडाऊनच्या कालावधीत वृद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या जमिनीवर काहीजणांनी बेकायदा ताबा मिळवून त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी त्यांच्याकडे ७० ते ८० लाख रूपयांची मागणी केली. नागरीकाने हे प्रकरण अतिरिक्त आयुक्त, पोलिस उपायुक्तांना सांगितल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले. मात्र, पोलिस ठाण्यातील अधिकारी कारवाई करणे तर दूरच, बेकायदा ताबा मारण्याचे प्रकार कसे सुरू आहेत, वरपासून खालीपर्यंत कसे पैसे खातात, असा पाढा वाचत कारवाई करण्याचे टाळत असल्याची सद्यस्थिती आहे.

सुखसागर येथे राहणारे ६० वर्षीय बांधकाम व्यावसायिक राजकुमार लोढा यांची बिबवेवाडी येथे जमीन आहे. संबंधीत जमीन त्यांच्या पत्नीच्या नावे आहे. जमीन डोंगरउतारावर असल्याने तेथे बांधकामाला परवानगी नाही. त्यामुळे त्यांनी संबंधित जमिनीवर महापालिकेच्या परवानगीने होर्डिंग लावण्यासाठी भाडेतत्वावर दिली आहे.

Breaking : ससून रुग्णालयात 'इतके' ऑक्‍सिजन बेडस्‌ उपलब्ध होणार; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती​

दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी लोढा यांच्या जमिनीवर पत्राशेड मारून बेकायदा ताबा घेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी १९ जुलै रोजी मार्केट यार्ड पोलिसात तक्रार दिली. मात्र, पोलिसांकडून कुठलीच कारवाई झाली नाही. त्यामुळे लोढा यांनी पोलिस आयुक्तालयात अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी तत्काळ परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त सुहास बावचे यांच्याशी संपर्क साधला. तर बावचे यांनीही मार्केट यार्ड पोलिसांना या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर लोढा मार्केट यार्ड पोलिसांकडे गेले. त्यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याऐवजी लोढा यांच्यापुढे प्रश्नांचा पाढा वाचला.

पुण्यातील तरुण-तरुणींनी कसा केला 'फ्रेंडशिप डे' साजरा? वाचा सविस्तर

दरम्यान, संबंधित प्रकरण तपासून योग्य ती कारवाई केली जाईल, असे अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांनी स्पष्ट केले.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेले उत्तर 
- तुम्ही वरिष्ठांकडे गेले तिथून आम्हाला फोन लावला म्हणजे काय आम्ही काम केले पाहिजे का?
- ताबा मारणारे लोक खालपासून वरच्यांपर्यंत सगळे पैसे घेऊन कामे करतात आणि ताबा काढतानाही असेच उद्योग करतात. 
- खालून वरपर्यंत सगळे पैसे खातात आणि सगळे काम करतात
- हे तुम्हाला कोणाला सांगायचं असेल, त्यांना सांगा मला काही फरक पडत नाही.

मैत्रीत आला दुरावा; स्टोरी काँग्रेसच्या राहुल ब्रिगेडची!​

मी दाऊद गँगशी कनेक्टेड आहे, प्रकरण महागात पडेल!

लोढा १९ जुलै रोजी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात तक्रार देऊन बाहेर येत होते. त्यावेळी जमिनीवर ताबा मारणारा व्यक्ती त्यांच्याजवळ आला. त्याने 'मी दाऊद गैंगशी कनेक्टेड आहे. हा विषय लवकर संपवा, अन्यथा तुम्हाला महागात पडेल,' अशा शब्दांत धमकी दिल्याचे तक्रारीमध्ये नमूद केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Some have illegally occupied the land of an elderly builder in Lockdown period