पुणे मेट्रोसाठी वापरणार अत्याधुनिक डबे

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 January 2021

‘पुणे मेट्रोसाठी वापरण्यात येणाऱ्या डब्यांचे काम प्रगतिपथावर असून ते देशातील वजनाने सर्वांत हलक्‍या स्वरूपाचे डबे असणार आहेत. यामुळे दोन टक्‍क्‍यांनी डिझेलची बचत होणार आहे,’’ अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.

पुणे - ‘पुणे मेट्रोसाठी वापरण्यात येणाऱ्या डब्यांचे काम प्रगतिपथावर असून ते देशातील वजनाने सर्वांत हलक्‍या स्वरूपाचे डबे असणार आहेत. यामुळे दोन टक्‍क्‍यांनी डिझेलची बचत होणार आहे,’ अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.

पालकांनो, शाळा-कनिष्ठ महाविद्यालयाकडून तुमची दिशाभूल होतेय का? मग ही बातमी वाचाच

वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गांवरील मेट्रो प्रकल्पाचे जवळपास ४८ टक्के काम पूर्ण झाले आहे. मेट्रोसाठी लागणाऱ्या डब्यांचे कंत्राट टिटागढ-फिरेमा या कंपनीला दिले आहे. या कंपनीने मेट्रोच्या डब्यांच्या बांधणीसाठी कोलकता येथे प्रकल्प उभारला असून तेथे हे डबे बांधणीचे काम सुरू आहे. पुणे मेट्रोसाठी एकूण तीन डब्याचे ३४ ट्रेन संच ही कंपनी पुरविणार आहे. पुणे मेट्रोसाठी बनविण्यात येणाऱ्या डब्यांच्या प्रतिकृतीचे अनावरण नुकतेच टीटागढ-फिरेमा या कंपनीमध्ये करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या वेळी महामेट्रो अध्यक्ष व शहरी विकास मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित आणि संचालक सुनील माथूर उपस्थित होते. पुणे मेट्रोसाठी बनविण्यात येणारे डबे हे अल्युमिनियम धातूचे आहेत. देशातील मेट्रो डब्यांचा एक्‍सल लोड सुमारे १६.४ टन असतो. परंतु, पुणे मेट्रोसाठी बनवण्यात येणाऱ्या डब्यांची एक्‍सल लोड १५.४ टन इतका असणार असणार आहे.

पुण्यात 'I Love Narhe' पॉईंटजवळ भूमकर पुलावर भीषण अपघातात 2 ठार तर 3 जखमी

एका डब्याची क्षमता ४८ प्रवाशांची
या डब्यांमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून एका डब्यामध्ये ४८ प्रवासी बसण्याची व्यवस्था असणार आहे. तीन कोच लांबीच्या एका मेट्रोमध्ये साधारणतः साडेआठशे प्रवासी प्रवास करू शकणार असल्याचे महामेट्रोतर्फे सांगण्यात आले.

चष्म्याचा नंबर घालवायचा आहे; तर मग हे वाचाच

पुणे मेट्रोसाठी बनविण्यात येणारे मेट्रोचे डबे हे अल्युमिनियम धातूपासून बनविण्यात येणार असून ते वजनाने देशातील सर्वांत हलके मेट्रोचे डबे असणार आहेत. या डब्यांमुळे ऊर्जेची बचत होणार आहे.
- डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sophisticated Bogue Use for Pune Metro