Corona Virus : 'ऑपरेशन नमस्ते' : कोरोना विरोधात लढा

The South Headquarters is also in Operation Namaste launched by the Army to fight the Corona
The South Headquarters is also in Operation Namaste launched by the Army to fight the Corona

Fight with Corona : पुणे  : 'मुश्किल वक्त कमांडो सक्त' याचे खरे उदाहरण म्हणजेच भारतीय लष्कर. देशात कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात कोरोनाशी लढा देण्यासाठी लष्कराने सुरू केलेल्या 'ऑपरेशन नमस्ते' अंतर्गत दक्षिण मुख्यालयाने सुद्धा विविध उपक्रम हाती घेतले आहे. 

Coronavirus : कोरोना व्हायरसचा फोटो समोर; कसा आहे कोरोना पाहाच! 
आपली अभिवादन करण्याची पद्धत म्हणजेच 'नमस्ते' आता संपूर्ण जगभरात स्वीकारली जात आहे. कोविड 19 विरुद्ध यशस्वी लढा देण्यासाठी लष्कराच्या मोहिमेचे नाव ऑपरेशन नमस्ते असे ठेवण्यात आले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
दक्षिण मुख्यालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या अंतर्गत मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट सी. पी. मोहंती यांनी 'व्हिडियो  कॉन्फरन्सिंग'द्वारे इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच या संकटावर मात करण्यासाठी वश्यक तयारी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये वैद्यकीय सुविधा, साधने व सुरक्षा साधनांचा पुरेसा साठा जमा करण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर विलगीकरण कक्ष तयार करण्यासाठी जागा व यासाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करण्याचे काम सुद्धा प्रगतीपथावर आहे.

शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी; पीककर्ज परतफेडीला मुदतवाढ!

विलगीकरण कक्षात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांना आवश्यक मदत पुरविण्यासाठी दक्षिण मुख्यालयाच्या वतीने वेळोवेळी संपर्क साधण्यात येत आहे. तसेच, माजी सैनिकांसाठी आवश्यक सेवांचा भाग म्हणून 'ईसीएचएस पॉलीक्लिनिक' कार्यरत ठेवण्यात आले असून शारीरिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी व गर्दीचे प्रमाण कमी करण्याकरिता त्यांच्यासाठी सर्व सोयी सुविधांच्या स्वतंत्र वेळा ठरविण्यात आल्या आहेत. 
 

सद्य परिस्थितीत लष्कराची भूमिका

सध्या सुरू आलेल्या या आपत्तीचा काळात लष्करामार्फत इराणमधून एअरलिफ्ट करण्यात आलेल्या 484 भारतीय नागरिकांना जैसलमेरच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून इराणमधूनच नुकते मायदेशी परतलेल्या 277 भारतीयांना जोधपूर येथील विलगीकरण कक्षात (वेलनेस सेंटर) ठेवण्यात आले आहे. तसेच वेळोवेळी देशातील प्रत्येक राज्य सरकार आणि प्रशासनाशी समनव्य साधत मदत पुरविण्यात येत आहे.

होम क्वारंटाइन होऊन कंटाळा आलाय? तुम्हाला आहे बक्षीस जिंकण्याची संधी
सध्या सुरू आलेल्या या आपत्तीचा काळात लष्करामार्फत इराणमधून एअरलिफ्ट करण्यात आलेल्या 484 भारतीय नागरिकांना जैसलमेरच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून इराणमधूनच नुकते मायदेशी परतलेल्या 277 भारतीयांना जोधपूर येथील विलगीकरण कक्षात (वेलनेस सेंटर) ठेवण्यात आले आहे. तसेच वेळोवेळी देशातील प्रत्येक राज्य सरकार आणि प्रशासनाशी समनव्य साधत मदत पुरविण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com