डीएसके प्रकरण : संधी असताना संपत्ती का विकली नाही?; सरकारी पक्षाचा युक्तिवाद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

- डीएसके प्रकरण

- सरकारी पक्षाकडून युक्तिवाद

पुणे : पुरेसे पैसे असतानाही डीएसके यांनी प्रकल्प पूर्ण केले नाहीत. 2015 ते 2017 या काळात ते कंपनीची संपत्ती विकून ठेवीदार आणि बॅंकांचे पैसे देवू शकले असते. सर्वांचे पैसे परत करायचे होते तर संधी असतानाही त्यांनी संपत्ती का विकली नाही, असा युक्तिवाद करून विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी डीएसके प्रकरणातील आरोपींच्या जामिनाला विरोध केला.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

दीपक कुलकर्णी (डीएसके), हेमंती कुलकर्णी आणि शिरीष कुलकर्णी यांच्या जामीन तर तन्वी कुलकर्णी, स्वरूपा कुलकर्णी आणि अश्‍विनी देशपांडे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी झाली. सेझची जमीन नातेवाईकांच्या नावे खरेदी करून त्यासाठी डीएसकेडीएल या पब्लिक लिमिटेड कंपनीतून पैसे दिले. या सर्वांत 184 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून, त्यातून गुंतवणूकदार व आयकर विभागाची फसवणूक झाली आहे. सेबी आणि आरबीआयचे नियम लागू होऊ नये म्हणून डीएसकेंनी भागीदारी कंपन्या काढल्या.

राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तुटपुंजी : अशोक चव्हाण

डीएसकेडीएलमधील पैसे त्या भागीदारी कंपन्यांमध्ये वर्ग करण्यात आले. बॅंकांकडून ज्यासाठी पैसे घेतले ती कामे केलीच नाही. फुरसुंगी येथील जमिनीचा व्यवहार हा 2009 साली झालेला आहे. मात्र तो व्यवहार 2006 साली झाल्याचे बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. या सर्व कटात आरोपींचा सहभाग आहे, असा युक्तिवाद ऍड. चव्हाण यांनी केला.

डीएसके ग्रुपने आत्तापर्यंत 50 लाख चौरस फुटाचे बांधकाम केले आहे. ठेवीदारांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने त्यांना कोणतेही मोठी प्रलोभने दाखवली नव्हती. फायनान्स कंपन्या, बॅंक आणि ठेवीदारांकडून घेतलेले पैस ग्रुपकडून 2017 पर्यंत नियमित परत करण्यात येत होते. या प्रकरणाचा फॉरेंसिक रिपोर्ट देण्यात यावा, अशी वारंवार मागणी करण्यात आली आहे. मात्र, अद्याप तो देण्यात आलेला नाही. पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पाठवले म्हणून फसवणूक होत नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील श्रीकांत शिवदे यांनी केला.

मुंबईकरांनो तुम्हाला मिळतंय शुद्ध पाणी; राजधानी तळालाच

अश्‍विनी देशपांडे यांची या प्रकरणातील भूमिका काय होती हे दोषारोपपत्र नमूद आहे. त्यामुळे त्यांना अटक करण्याची गरज नसल्याचा युक्तिवाद ऍड. प्रसाद कुलकर्णी यांना केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी (ता. 18) होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special Public Prosecutor asking DSK about Property Sell