'परीक्षा फी नाही, मग निकाल पण नाही'; पुणे विद्यापीठातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर

ब्रिजमोहन पाटील 
Saturday, 8 August 2020

काही विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरले नसल्याने विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयातील त्या वर्गाचा निकाल अडवून ठेवले असल्याचा आरोप प्राचार्यांनी केला आहे.

पुणे : काही विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क न भरल्याने अख्ख्या वर्गाचा निकाल अडवून ठेवल्याचा प्रकार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांत घडले आहेत. प्राचार्यांनी शुल्का संदर्भात हमीपत्र दिल्यानंतर निकाल जाहीर केला जात आहे. दरम्यान, तब्बल ४२ लाख रुपयांचे परीक्षा शुल्क अद्याप विद्यापीठाला मिळाले नसल्याचे समोर आले आहे. 

विद्यापीठाच्या पदवीच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षेसाठी शुल्क भरण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना दिल्या होत्या. कोरोनामुळे परीक्षा शुल्क भरण्यास वेळोवेळी मुदतवाढही देण्यात आली. त्याच दरम्यान कोरोनामुळे अंतिम वर्ष वगळता सर्व विद्यार्थ्यांचे निकाल मागील गुणांवरून करण्याचा निर्णय घेण्यात आला.  

कोरोनाची दुसरी लाट येणार नाही याची खबरदारी घ्या; मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश​

कोरोनामुळे विद्यार्थ्यांनी भरलेला फॉर्म महाविद्यालयांनी तपासल्यानंतर विद्यार्थ्यांनी शुल्क विद्यापीठाकडे जमा करणे अपेक्षित होते. मात्र, काही विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरले नसल्याने विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयातील त्या वर्गाचा निकाल अडवून ठेवले असल्याचा आरोप प्राचार्यांनी केला आहे. याबाबत कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. 

प्राचार्य डॉ. संजय चाकणे म्हणाले, "महाविद्यालयाने परीक्षा अर्ज मंजूर केल्यानंतर विद्यार्थ्यांने शुल्क भरणे अपेक्षित होते, तसेच शुल्क भरले की नाही ते विद्यापीठाने तपासणी करायला पाहिजे होते, पण तसे न होता सर्वच विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला. ज्या विद्यार्थ्यांने पैसे भरले आहेत, त्याचा निकाल लागला पाहिजे."

पुण्याचे जिल्‍हाधिकारी राम यांची पंतप्रधान कार्यालयात बदली; उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा​

विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे म्हणाले, "महाविद्यालयांकडून ३ कोटी ६८ लाख रुपये 
परीक्षा शुल्क येणे बाकी होते. आता २९ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून ३६ लाख ४० हजार रुपयांचे शुल्क गोळा केले आहे, पण हे पैसे अद्याप भरलेले नाहीत. तर ६८ महाविद्यालयांच्या सुमारे ३ हजार विद्यार्थ्यांनी ६ लाख ५० हजार रुपये महाविद्यालय आणि विद्यापीठ कुठेही भरलेले नाहीत. महाविद्यालयांकडून शुल्क भरले जाईल या हमीपत्रावरून निकाल देण्यात येत आहे."

विद्यार्थ्यांनो, पाॅलिटेक्निक अॅडमिशनच्या तारखा झाल्या जाहीर; वाचा सविस्तर​

एकाच महाविद्यालयाने २२ लाख रुपये थकवले
एकीकडे निकाल रखडल्याने आरडाओरडा सुरू झालेली असताना नगरमधील एका महाविद्यालयाने परीक्षा शुल्काचे तब्बल २२ लाख रुपये विद्यापीठाकडे भरलेच नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SPPU affiliated colleges withholding results due to non payment of exam fees