SPPU : पदवीचे सर्व निकाल जुलै अखेरपर्यंत लागणार, अभियांत्रिकीची शुक्रवारी शक्यता

कोरोनानंतर विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक पूर्णतः कोलमडले आहे.
SPPU university
SPPU universityesakal

SPPU - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांचे पदवीचे सर्व निकाल जुलै अखेर घोषित होतील, असा विश्वास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी व्यक्त केला आहे. बहुतेक अभ्यासक्रमांच्या परीक्षा आता अंतिम टप्प्यात असून, महाविद्यालयांचे गुणदान पूर्ण झाल्यानंतर तातडीने निकाल घोषित होणार आहेत.

SPPU university
SPPU News: विद्यापीठातील बी.एसस्सी ब्लेंडेड आता चार वर्षांचे

कोरोनानंतर विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक पूर्णतः कोलमडले आहे. एप्रिल-मे महिन्यातील उन्हाळी सत्राच्या परीक्षा जुलै महिन्यात पार पाडत असून, परीक्षा संपल्यानंतर काही दिवसांच्या आतच निकाल घोषित करण्यासाठी परीक्षा विभागाने पावले उचलली आहे. त्यासाठी कॅप सेंटर वाढविण्यापासून डेटाच्या एन्ट्रीपर्यंत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

SPPU university
Mumbai : मुंबई विमानतळावर परदेशी चलनासह परदेशी नागरिकांना अटक

पुढील प्रवेशासाठी आणि शैक्षणिक वेळापत्रक पूर्ववत होण्यासाठी लवकरात लवकर निकल घोषित होणे आवश्यक आहे. डॉ. काकडे सांगतात, ‘‘विज्ञान शाखेतील सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा संपल्या आहेत. तर वाणिज्य शाखेच्या परीक्षा या आठवड्यात संपतील. त्यामुळे बहुतेक निकाल जूलै अखेर घोषित केले जातील. विद्यार्थ्यांना वेळेत निकाल मिळावे म्हणून आवश्यक सर्व उपाययोजना आम्ही करत आहोत.’’

SPPU university
Mumbai News : थेट रेल्वे इंजिन वाहतुकीत अपहाराचा प्रयत्न! वडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

अंतर्गत गुणदान अपूर्ण

विद्यार्थ्याचा अंतिम निकाल घोषित करण्यासाठी महाविद्यालयांनी अंतर्गत मुल्यमापणाचे गुणदान वेळेत करणे गरजेचे आहे. मात्र, यामध्ये काही महाविद्यालये मागे असल्याची खंत डॉ. महेश काकडे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘अंतर्गत आणि बहिस्त मुल्यमापणाचे गुणदान वेळेत होणे आवश्यक आहे. एका जरी महाविद्यालयांनी याला उशीर केल्यास संपूर्ण विद्यापीठाचा निकाल लांबवावा लागतो. त्यामुळे महाविद्यालयांनी तातडीने गुणदान पूर्ण करावे.’’ सुरवातीला ५ जुलै, नंतर ७ जुलै आणि आता ११जुलै पर्यंतची मुदत दिल्यानंतरही काही महाविद्यालयांचे गुणदान अपूर्ण असल्याचे डॉ. काकडे यांनी सांगितले.

SPPU university
SPPU : विद्यापीठात विद्यार्थी संघटनेच्या आंदोलनासाठी बेकायदा मंडप टाकणाऱ्यावर कारवाई

अभियांत्रिकीचा निकालाची शुक्रवारी शक्यता

विद्यापीठाशी संलग्न सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या पदवीचा निकाल शुक्रवारी (ता.१४) घोषित होण्याची शक्यता आहे. मागील महिन्यातच अभियांत्रिकीच्या परीक्षा पार पडल्या असून, लवकरच त्यांचा निकाल घोषित होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com