बारामतीकरांसाठी दिलासादायक बातमी! राज्य सरकारने 84 कोटींचा निधी केला मंजूर

मिलिंद संगई
Wednesday, 24 February 2021

बारामतीसह सातारा, नगर, सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनाही याचा लाभ होणार आहे.

बारामती (पुणे) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील यंत्रसामग्री आणि साधनसामग्री खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने बुधवारी (ता.24) 84 कोटी 86 लाख रुपयांचे अतिरिक्त अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या बाबतचा अध्यादेश राज्य सरकारने बुधवारी जारी केला. यामुळे आता वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे काम पूर्णत्वास जाण्यास गती प्राप्त होणार आहे. 

बारामती एमआयडीसीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे कामकाज गतवर्षापासूनच सुरु झाले असून रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर आहे. या साठी आवश्यक यंत्रसामग्री खरेदीसाठी निधीची गरज होती, आता शासनाने तब्बल 84 कोटींचा निधी मंजूर केल्यामुळे हे काम वेगाने मार्गी लागणार आहे.

स्टेडियमला नाव मोदींचं; बॉलिंग एंड अंबानी आणि अदानींचे!​

बारामतीसह सातारा, नगर, सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनाही याचा लाभ होणार आहे. या मध्ये दंतशल्यचिकित्साशास्त्र, स्त्री रोग व प्रसूती शास्त्र, औषधवैद्यक शास्त्र, क्षय व उरोरोगशास्त्र, नेत्रशल्यचिकित्सा, बालरोग शास्त्र, कान, नाक व घसा, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, बधिरीकरण शास्त्र, क्ष किरणशास्त्र, मनोविकारशास्त्र, मध्यवर्ती औषध भांडार, रक्तपेढी, शल्यचिकित्साशास्त्र व त्वचा आणि गुप्तरोग विभागासाठी हे अनुदान प्रदान करण्यात आले आहे. सदरची यंत्रसामग्रीची खरेदी हाफकिन बायो फार्मास्युटिकल्स कार्पोरेशन लिमिटेडच्या वतीने करण्याचे निर्देश यात आहेत. प्रत्येक विभागाला लागणा-या सर्व बाबींची सखोल यादी या अध्यादेशात नमूद करण्यात आली आहे. 

सिंहगड रस्त्यावर हातात कोयता, पिस्तूल घेऊन नाचणे पडले महागात; व्हिडिओ व्हायरल​

असे असेल स्वरुप
•    रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय मिळून 23 एकर जागेवर 12 लाख चौरस फूटांच्या इमारतींचे काम पूर्ण. 
•    वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय, वसतिगृह व निवासस्थाने बांधून तयार.
•    750 कोटी रुपयांचा एकूण प्रकल्प
•    पाच वर्षात मेडीकल कॉलेजमध्ये टप्याटप्याने 500 विद्यार्थी संख्या होणार.
•    रुग्णालयात 13 मोड्यूलर ऑपरेशन थिएटर्स असणार
•    सिटीस्कॅन पासून ते एमआरआयपर्यंत सर्व यंत्रणा उपलब्ध होणार.
•    पाच जिल्ह्यातील लोकांना होणार फायदा
•    सरकारी दराने औषधोपचार व शस्त्रक्रीया होणार.
•    एअर अँम्ब्युलन्ससाठी रुग्णालयावर हेलिपॅड प्रस्तावित
•    विद्यार्थी, नर्स, शिकाऊ डॉक्टरांसाठी 850 बेडक्षमतेच्या वसतिगृहाची 5 इमारतीतून सोय

गजा मारणेच्या जवळच्या साथीदाराविरुद्ध समर्थ व विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

रुग्णालयात खालील सुविधा रुग्णांना मिळतील :
•    सेंट्रलाईज्ड मेडीकल गॅस पाईललाईन सिस्टीम्स
•    अत्याधुनिक रेडीओलॉजी सुविधा
•    फ्लुरोस्कोपी
•    मॅमोग्राफी (कर्करोगाच्या गाठीसाठीची तपासणी)
•    सोनोग्राफी
•    सीटी स्कॅन व एमआरआय सुविधा
•    नवजात शिशु 
•    फिजीओथेरपी
•    अपघातग्रस्तांसाठीचा स्वतंत्र विभाग
•    डायलिसीस सुविधा
•    औषधाची दुकाने
•    ब्रॉंकोस्कोपीची सुविधा
•    सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग.
•    सेंट्रलाईज्ड वातानुकूलन यंत्रणा
•    24 तास रुग्णवाहिकेची सेवा.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state government sanctioned an additional grant of Rs 84 crore for govt medical college in Baramati