राज्य सरकार पूरग्रस्तांच्या खंबीरपणे पाठीशी- अजित पवार

राज्यातील कोल्हापूर, सांगली व सातारा येथील पूरपरिस्थिती अजूनही बिकट आहे.
Ajit Pawar
Ajit PawarFile Photo

बारामती : राज्यातील कोल्हापूर (kolhapur), सांगली (sangli) व सातारा (satara) येथील पूरपरिस्थिती अजूनही बिकट आहे, मी आजच मुख्यमंत्र्यांशी बोललो असून आज सातारा जिल्ह्याचा व उद्या कोल्हापूरचा दौरा मी करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी दिली. बारामतीतील (baramati) आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पूरपरिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी शासकीय यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. (State Government strongly supports flood victims say Ajit Pawar)

ते म्हणाले, जयंत पाटील (jayant patil), सतेज पाटील (satej patil), बाळासाहेब पाटील (balasaheb patil), विभागीय आयुक्त व तिन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्याशी मी वैयक्तिक बोललो आहे. विभागीय आयुक्त व मी आम्ही संयुक्त दौरा करणार असून, तिन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री व स्थानिक प्रशासनाच्या बैठका घेऊन पाणी कमी होण्यासह इतर मदत करण्यासाठी आम्ही नियोजन करणार आहोत. अडचणीतील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दुसरीकडे कोकणातील पूरासंदर्भात आदिती तटकरे, उदय सामंत, अनिल परब यांच्याशीही मी संपर्कात आहेत, मुख्यमंत्रीही कोकणाच्या दौ-यावर आज जात आहेत, पूरपरिस्थितीत अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीशी राज्यसरकार खंबीरपणे उभे आहे, अशा सर्वांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांसह आम्ही सरकारमधील सर्वांनी घेतलेली आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळून जीवीतहानी झाली आहे, रस्ते, पूल घरांसह अनेक बाबींचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलेले असून गाळही आहे, सर्व यंत्रणा आम्ही कामाला लावल्या आहेत. महावितरणच्या बारामती परिमंडळातील मुख्य अभियंत्यांना पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्या भागात पाठविलेले आहे, त्यांची सर्व टीम तिकडे गेलेली आहे.

वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करण्यासाठी आजूबाजूच्या जिल्ह्यातूनही कुमक तिथे पाठविण्यात आली आहे. दरम्यान, पूराच्या पार्श्वभूमीवर नवीन साथीचे आजार उद्भवु नये यासाठी आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. पूरपरिस्थितीवर मात करुन जनजीवन पूर्ववत करण्यासाठी सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. लोकांच्या खाण्यापिण्याचे हाल होऊ नयेत या साठी तांदूळ, डाळी व रॉकेल पुरविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जवळपास एक लाख लोकांचे स्थलांतर करण्यात आले असून गरजेनुसार अजूनही यात निर्णय घेण्यात येणार आहे.

Ajit Pawar
तरुणामुळं ट्रॅफिकचा खेळखंडोबा! कारण ऐकून थक्क व्हाल

वाट पाहू नका.....

पूरग्रस्त भागातील जिल्हाधिका-यांनी गरजेनुसार जे जे आवश्यक असेल ते जागेवरच खरेदी करावे, त्यासाठी वाट पाहत बसू नये, अशा सूचना दिल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. नौदल, हवाईदल व लष्कराच्या टीम मदत करीत आहेत, एनडीआरएफ, एसडीआरएफच्या टीम बोटीसह मदत कार्यात हातभार लावत आहे.

Ajit Pawar
शेतकऱ्यांनो, आता घरबसल्या नोंदवा पीक नुकसानीची माहिती

अलमट्टीबाबत महाराष्ट्र व कर्नाटक सरकार संपर्कात

अलमट्टी धरणातून सोडण्यात येणा-या पाण्याच्या संदर्भात कर्नाटक व महाराष्ट्र सरकार, दोन्ही राज्यांचे जलसंपदामंत्री व दोन्ही राज्यांचे अधिकारी परस्परांच्या संपर्कात असल्याचेही अजित पवार यांनी म्हटले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com