सांगली-कोल्हापूरच्या पूरस्थिती उपाययोजनांच्या संशोधनासाठी निधी देणार; उपमुख्यमंत्र्यांनी केली घोषणा!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 June 2020

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात दरवर्षी निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीबाबत येथील ‘अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च’ आणि ‘शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया’चे तज्ज्ञ संशोधन करीत आहेत.

पुणे : कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांतील पूर परिस्थितीबाबत पुढील संशोधनासाठी राज्य सरकार निधी उपलब्ध करुन देईल. तसेच, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करुन उपाययोजनांची दिशा निश्चित करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

- ...अन् तरीही रक्तदान करत पोलिस पुन्हा एकदा समाजासाठी धावून आले!

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात दरवर्षी निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीबाबत येथील ‘अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च’ आणि ‘शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया’चे तज्ज्ञ संशोधन करीत आहेत. या तज्ज्ञांची निरीक्षणे, संशोधन, उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री पवार यांनी घेतला.

- दहावी-बारावी निकालाच्या तारखांबाबत राज्य शिक्षण मंडळाने दिले स्पष्टीकरण; निकालाच्या तारखा...!

विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी आयोजित बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, धरण पुनर्स्थापना समितीचे जागतिक बँकेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष दीपक मोडक, तज्ज्ञ डॉ. पद्माकर केळकर, प्रा. सुधीर आगाशे, प्रा. भालचंद्र बिराजदार, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सचिव प्रमिला गायकवाड, संस्थेचे सहसचिव ॲड. भगवानराव साळुंखे, सुनील ठाकरे, जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञ प्राध्यापक उपस्थित होते. 

- इंजिनिअर तरुणाने शेतीचा नाद केला, लॉकडाउनमध्ये कमावले 13 लाख

‘कृष्णा खोरे, पूर आणि उपाययोजनां’संदर्भात तज्ज्ञांनी अहवालाचे सादरीकरण केले. तज्ज्ञांनी सूचविलेल्या उपाययोजनांवर बैठकीत चर्चा  करण्यात आली. धरण पुनर्स्थापना समितीचे मोडक आणि डॉ. केळकर यांनी सादरीकरण केले. कृष्णा नदीला येणाऱ्या पुरामध्ये कोयना, राधानगरी धरणांच्या सांडव्याच्या विसर्गाचा भाग 30 ते 40 टक्के असतो. धरणामध्ये पावसाळ्यात तारखेनुसार किती पाणीपातळी राखावी, याबाबत नव्याने नियोजन करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. कोयना धरणाच्या पाणीपातळीबाबत तयार केलेले वेळापत्रक मोडक यांनी सादर केले. 

तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनाच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा करुन पुढील दिशा ठरवावी, असे निर्देश पवार यांनी दिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State govt will provide fund for research of measures at Sangli and Kolhapur flood affected area says Deputy CM Ajit Pawar