

NSUI Launches Indefinite Hunger Strike Against SPPU Fee Hike
Sakal
विनयन वाघमारे
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेल्या काही वर्षांपासून होणारी सातत्यपूर्ण शुल्कवाढ आणि विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ, नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) तर्फे बुधवारपासून (दि. २२ एप्रिल) विद्यापीठ परिसरात बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. प्रवेश अर्जांची संख्या रोडावत असतानाही शुल्कवाढ केली जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.