पुणे विद्यापीठाने स्कॉलरशिपला लावली कात्री; निम्म्यापेक्षा जास्त कपात

Students
Students

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केल्याचा गवगवा केला पण आता विद्यापीठाने राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीच्या रकमेची थेट ५०टक्के कपात केली आहे, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तर, शिष्यवृत्तीच्या रकमेत कपात केलेली नसून, केवळ निकष बदलले आहेत, असे स्पष्टीकरण व्यवस्थापण समिती सदस्यांनी केले आहे.

पुणे विद्यीपाठातर्फे महापुरुषांच्या नावाने पाच शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात. त्यासाठी २०१९-२०साठी ९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. शिष्यवृत्ती संदर्भात विद्यापीठाने व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. सुधाकर जाधवर यांच्या अध्यक्षतेखाली समितीने नियुक्त केली होती. त्यांचा अहवाल सादर झाल्यानंतर विद्यापीठाने परिपत्रक काढून प्रत्येक योजनेच्या अटी व सूचना जाहीर केल्या. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्याचे काम सुरू आहे.

विद्यापीठाने राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीची रक्कम कमी करण्यात आली आहे. गेल्यावर्षी पदवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १२ हजार रुपये तर पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना १८ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली होती. तर यंदा केवळ कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना ६ हजार आणि ८ हजार रुपये. तर विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना १० हजार आणि १६ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ही रक्कम २ हजार ३०० विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.

युक्रांदचे उपाध्यक्ष कमलाकर शेटे म्हणाले, ‘‘शिक्षणाचा खर्च वाढत आहे, राज्य शासनाच्या शिष्यवृत्तीची रक्कम अपुरी आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या शिष्यवृत्तीचा विद्यार्थ्यांना आधार होता. विद्यापीठाकडून इतर गोष्टींवर विनाकारण खर्च करत असताना त्यावर नियंत्रण न आणता शिष्यवृत्तीची रक्कम कपात करून अन्याय केला आहे.’’

‘‘विद्यापीठाच्या शिष्यवृत्तींबाबत नेमलेल्या समितीने कुलगुरूंकडे अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये शिष्यवृत्तीच्या रकमेत कपात करण्यात आली नाही, केवळ निकष बदलले आहे. शिष्यवृत्तीसाठी कमी अर्ज येत असल्याने ती बुडत होती. त्यापेक्षा तीच रक्कम इतर विद्यार्थी योजनांसाठी वापरली जाईल, त्यात सुमारे ३ हजार विद्यार्थ्यांना फायदा होईल.’’
- डॉ. सुधाकर जाधवर, सदस्य, व्यवस्थापन परिषद

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com