Indapur : ऊसवाहतूक करणारी बैलगाडी पाण्यात पडून अपघात

कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी कारखान्यास कालठण नंबर एक, कळाशी, गंगावळण, करेवाडी, बनकरवाडी, अगोती नंबर २ व ३ या गावातील ऊस वाहतूक या पुलरस्त्यामार्गे होते
indapur
indapursakal media

इंदापूर : मौजे राजवडी ते कालठण ( ता. इंदापूर ) रस्त्यावरील धोकादायक पुलावरून ऊस वाहतूक करणारी बैलगाडी पाण्यात पडून बैलाचा मृत्यू झाला तर बैलगाडी चालक व त्यांची पत्नी वाचली. पुलास संरक्षक कठडे नसल्याने हा अपघात झाला.

indapur
भाजप नेत्याच्या भाच्याने आर्यनला क्रूजवर नेलं - नवाब मलिक

कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी कारखान्यास कालठण नंबर एक, कळाशी, गंगावळण, करेवाडी, बनकरवाडी, अगोती नंबर २ व ३ या गावातील ऊस वाहतूक या पुलरस्त्यामार्गे होते. दि. ६ ऑक्टोबर रोजी कालठण येथून ऊस घेऊन बाळू बाबू भिसे (रा.मलठण ता.कर्जत जि.अहमदनगर ) व त्यांची पत्नी यांची कर्मयोगी कारखान्यास ऊस वाहतूक करणारी गाडी क्रमांक ९७ ही पुलास सुरक्षा कठडे नसल्याने थेट आठ ते दहा फूट पाण्यात पडून अपघात झाला.

ऊस वाहतूक करणारे भिसे व त्यांच्या पत्नीने प्रसंगावधान राखून पाण्यात उडी टाकल्याने नशीब बलवत्तर असल्यामुळे ते बचावले.मात्र सत्तर ते ऐंशी हजार रुपये किंमत असलेल्या बैलाचा ऊस अंगावर पडल्याने मृत्यू झाला. कर्मयोगी कारखान्याने तातडीने जेसीबी व सुरक्षा रक्षक पाठविले. त्यांना कालठण व राजवडी परीसरातील ग्रामस्थांनी मदतकेल्याने बाळू भिसे व त्यांची पत्नी वाचली. ऊस वाहतूक करणाऱ्या बैलांचा कारखाना विमा उतरवत असल्याचे कारखान्याच्या कृषी विभागाने स्पष्ट केले.

उजनी धरण १०० टक्के भरल्यानंतर पाणी फुगवटा वाढल्यानंतर किंवा मोठा पाऊस पडल्यानंतर हा पूल पाण्याखाली जातो. या पुलास संरक्षक कठडे नसल्याने आजपर्यंत शेकडो लहानमोठे अपघात होवून जीवित व वित्तहानी झाली आहे तर काहींना अपंगत्व आले आहे. त्यामुळे पुलाची उंची वाढवून पुलास संरक्षक कठडे उभा करणे गरजेचे असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत मांढरे यांनी व्यक्त केले तर सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री व कर्मयोगी कारखाना अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, संचालक हनुमंत जाधव, जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने, पंचायत समिती सदस्य पुष्पा रेडके तसेच तालुकास्तरीय नेत्यांनी गेल्या ५० वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते नितीन दीक्षित यांनी केली.

indapur
नवेद नौकेचा शोध घ्या; अन्यथा समुद्रात चक्का जाम

विशेष म्हणजे दि. २८ ऑक्टोबर रोजी दै. सकाळ ने या समस्येकडे प्रशासन व नेत्यांचे लक्ष वेधले होते. मात्र कार्यवाही झाली नाही. त्यामुळे यास जबाबदार कोण अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com