अँटिबायोटिक म्हणून होणार ‘साखरे’चा वापर

सम्राट कदम
Saturday, 23 January 2021

जिवाणूजन्य आजारांच्या उपचारासाठी प्रतिजैविके (अँटिबायोटिक) औषधांचा वापर केला जातो. परंतु, वर्षानूवर्षे या औषधांच्या वापरामुळे जिवाणूंनी प्रतिजैवकांविरूद्ध प्रतिकारशक्ती विकसित केली आहे. पर्यायाने औषधे निष्प्रभ ठरण्याचा प्रमाण वाढले आहे.

पुणे - जिवाणूजन्य आजारांच्या उपचारासाठी प्रतिजैविके (अँटिबायोटिक) औषधांचा वापर केला जातो. परंतु, वर्षानूवर्षे या औषधांच्या वापरामुळे जिवाणूंनी प्रतिजैवकांविरूद्ध प्रतिकारशक्ती विकसित केली आहे. पर्यायाने औषधे निष्प्रभ ठरण्याचा प्रमाण वाढले आहे. यावर उपाय शोधण्यासाठी शास्त्रज्ञ नवनवीन प्रयोग करत असून, नुकतेच मुंबईच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) शास्त्रज्ञांनी विशिष्ट प्रकारच्या साखरेचा अशा विषाणूंची वाढ रोखण्यासाठी वापर करणे शक्‍य असल्याचे सिद्ध केले आहे. आयआयटीचे शास्त्रज्ञ प्रा. सुवर्ण कुलकर्णी आणि अमेरिकेतील बावडोइन कॉलेजचे प्रा. डॅनिअल डुबे यांचे हे संशोधन ‘जर्नल ऑफ केमिकल सायन्सेस’मध्ये प्रसिद्ध झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रतिजैविके म्हणजे काय? 
रोगकारक जिवाणूंच्या विरुद्ध लढण्यासाठीच विशिष्ट प्रकारच्या रसायनांचा वापर केला जातो. त्याला प्रतिजैविके असे म्हटले जाते. १९२८मध्ये प्रथमच ‘पेनिसिलीन’च्या शोधाने मानवाला आजारांविरुद्ध लढण्यासाठी हे प्रतिजैविक औषधांची देणगी मिळाली. कॉलरा, प्लेग, क्षयरोग, कुष्ठरोग यासारखे मोठे आजारही जीवाणूंच्या संसर्गामुळे होतात.  

संभाजी बिडीचं नाव बदललं; संभाजी ब्रिगेडच्या लढ्याला यश

प्रतिजैविकांना पर्यायांची आवश्यकता का?
वर्षानुवर्षे जीवाणूंविरूद्ध आपण प्रतिजैविकांचा वापर करत आहे. सतत संपर्कात आल्यामुळे जिवाणूंनी प्रतिजैविकांविरुद्ध जगण्याची क्षमता निर्माण केली आहे. पर्यायाने ते प्रतिजैविकांपासून तयार केलेले औषध निष्प्रभ ठरवतात. त्यामुळे शास्त्रज्ञांना दर काही वर्षांनी प्रतिजैवकांमध्ये बदल करत नवीन औषधे तयार करावे लागते. आता बहुतेक जिवाणूंनी प्रतिजैविकांविरुद्ध प्रतिकारशक्ती विकसित केली आहे. त्यामुळे आता जिवाणूंविरुद्ध नव्या औषधांची गरज आहे.

सीरममधील आगीसंदर्भात आलं महत्त्वाचं अपडेट; तपास पथकानं दिली माहिती 

काय आहे नवीन संशोधन?
जीवाणूंचे बाह्यआवरण (पेशीभित्तीका) हे मोनोसॅकेराइड्स आणि प्रथिनांपासून झालेले असते. जीवाणूंच्या वेगवेगळ्या पेशींसाठी वेगवेगळ्या प्रकारातील रचनात्मक भिन्नता असलेल्या साखरेचा बाह्यआवरणात वापर होतो. जिवाणूंची ही पेशिभत्तीका त्यांचे संरक्षण तर करतेच त्याचबरोबर मानवी शरिरात संसर्ग करण्यासाठी मदतही करते.

पुण्यात शाळेची घंटा वाजणार; पालकांची लेखी मंजुरी अत्यावश्यक

आयआयटीमुंबईच्या शास्त्रज्ञांनी ही पेशिभित्तीकाच कमकुवत करणाऱ्या साखरेचे पृथक्करण करण्याचा शोध घेतला आहे. बेंझाइल आणि फ्लूरो रासायनिक गटांतील साखरेचे पृथक्करण केल्यानंतर त्यांना या विशिष्ट प्रकारातील साखरेचे तीन प्रकार मिळाले आहे. नेहमीच्या सवयीप्रमाणे जिवाणू या विशिष्ट साखरेला अन्न म्हणून वापरतात, पर्यायाने ही साखर जीवाणूंच्या शरीरात गेल्यावर त्यांची पेशीभित्तीका कमकुवत करते.

संशोधनाचे फायदे

  • या विशिष्ट साखरेमुळे जिवाणूंची वाढ थांबते 
  • पारंपारिक वापरातील प्रतिजैविक औषधांना पर्याय
  • संपूर्णतः नवीन पद्धत असल्याने जिवाणूंना यांच्या विरुद्ध प्रतिकारशक्ती तयार करणे अवघड
  • शरीरातील ठराविकच रोगकारक जिवाणूंना लक्ष करणे शक्य

आमच्या संशोधनामुळे विशिष्ट प्रकारातील साखरेचा निदान आणि उपचारासाठी उपयोग होत असल्याचे सिद्ध झाले आहे. या मुळे संशोधनाचा नवीन आयाम उपलब्ध झाला आहे. ठरवून एका विशिष्ट प्रकारातील रोगकारक जिवाणूंना लक्ष करता येते. भविष्यात या संशोधनातून नवीन काय बाहेर येत आहे, याकडे लक्ष आहे.
- प्रा. सुवर्ण कुलकर्णी, शास्त्रज्ञ, आयआयटी, मुंबई.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugar will be used as an antibiotic