पबजीमुळे पुण्यात 16 वर्षाच्या मुलाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

काही दिवसांपूर्वी त्याने नवीन मोबाईल घेतला होता. सतत मोबाईलमध्ये गुंतल्यामुळे त्याची आजी त्याला त्यापासून दूर राहण्यास सांगत होती. दरम्यान, त्याने रविवारी मोबाईल गेम खेळताना आत्महत्या केली.

पुणे : पबजी या मोबाईल गेमच्या आहारी गेलेल्या अवघ्या 16 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना बिबवेवाडी परिसरामध्ये घडली आहे. 

Video:पबजी खेळून डोकं फिरलं, घटनेपेक्षा तरुणाचं नाव जास्त चर्चेत! 

बिबवेवाड़ी येथे आपल्या आजीसमवेत16 वर्षीय मुलगा राहत होता. संबंधीत मुलगा सातत्याने मोबाईलमध्ये गेम खेळण्यात व टिकटॉक व्हिडिओ बनविण्यात वेळ घालवित होता. त्याच्या मोबाईल गेमच्या व्यसनामुळे तो दहावीच्या परीक्षेत अनुउत्तीर्ण झाला होता.

फुगेवाडी दुर्घटनेत ठेकेदाराचा निष्काळजीपणाच; अप्पर तहसीलदार कार्यालयाचा ठपका

काही दिवसांपूर्वी त्याने नवीन मोबाईल घेतला होता. सतत मोबाईलमध्ये गुंतल्यामुळे त्याची आजी त्याला त्यापासून दूर राहण्यास सांगत होती. दरम्यान, त्याने रविवारी मोबाईल गेम खेळताना आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी उघडकीस आला असून बिबवेवाडी पोलिस या प्रकरणाचा शोध घेत आहेत. मुलाची आजी महापालिकेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून कामाला आहे.

स्थायीचे अध्यक्षपद रासनेंकडे, तर सभागृह नेतेपदाची माळ घाटेंच्या गळ्यात 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide of 16 year old boy in Pune due to PUBG