esakal | माळेगाव, कोरोनाच्या समस्येत शेतकऱ्यांना शारदा कृषी वाहिनीचा आधार
sakal

बोलून बातमी शोधा

शारदानगर (ता. बारामती) - येथील शारदा कृषी वाहिनीद्वारे सुरू असलेल्या ऊस पिक शेती शाळेस जिल्हा परिषद सदस्या रोहिणी रविराज तावरे यांनी भेट दिली.

पुणे जिल्ह्यात कृषी विभागाने खरिप हंगाम डोळ्यासमोर ठेवत शेतकऱ्यांसाठी शेतीशाळा सुरू केल्या खऱ्या, परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बहुतांशी ठिकाणी या उपक्रमाला खूपच मर्य़ादा आल्या. मात्र या समस्येवर मार्ग काढण्यासाठी पणदरे (ता. बारामती) येथील सहाय्यक कृषी अधिकाऱ्याने शारदानगरच्या शारदा कृषी विहिनीचा (रोडीओचा) आधार घेत शेतीशाळेचा उपक्रम सर्वार्थाने यशस्वी ठरविला.

माळेगाव, कोरोनाच्या समस्येत शेतकऱ्यांना शारदा कृषी वाहिनीचा आधार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

माळेगाव - जिल्ह्यात कृषी विभागाने खरिप हंगाम डोळ्यासमोर ठेवत शेतकऱ्यांसाठी शेतीशाळा सुरू केल्या खऱ्या, परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बहुतांशी ठिकाणी या उपक्रमाला खूपच मर्य़ादा आल्या. मात्र या समस्येवर मार्ग काढण्यासाठी पणदरे (ता. बारामती) येथील सहाय्यक कृषी अधिकाऱ्याने शारदानगरच्या शारदा कृषी विहिनीचा (रोडीओचा) आधार घेत शेतीशाळेचा उपक्रम सर्वार्थाने यशस्वी ठरविला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऊस शेतीच्या पार्श्वभूमिवर मशागत, बेणी निवड, बिजप्रक्रिया, प्रत्यक्ष लागवड, हुमणी, खोडकीड, लोकरीमावा नियंत्रण, विविध प्रकारचे सापळे, वनस्पतीजन्य अर्क, जैविक अर्क तयार करणे, किड व रोग ओळखणे व नियंत्रण करणे आदी विषयांवर रेडीओद्वारे शेतकाऱ्यांना मार्गदर्शन केले जाते.

पानशेत धरणामध्ये बेकायदा बोटींग; पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

विशेषतः रेडीओद्वारे सकाळी ९ व सायंकाळी ६ वाजता प्रसारित होणाऱ्या या उपक्रमाला सध्या उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले. विशेषतः शेतकऱ्यांच्या दृष्टीने यशस्वी ठरलेल्या वरील उपक्रमाची माहिती घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. रोहिणी रविराज तावरे आदी पदाधिकऱ्यांनी शारदा कृषी वाहिनीला भेट दिली. तसेच उपविभागिय कृषी अधिकारी बाळाजी ताटे आणि तालुका कृषी अधिकारी दत्तात्रेय पडवळ यांनीही रिडीओद्वारे होत असलेल्या शेतीशाळेचे कौतूक केले, अशी माहिती शारदा कृषी वाहिनीचे सुनिल शिरसिकर यांनी दिली.

पुण्यात पावसाचा जोर ओसरणार; यंदा शहरात ५९४.२ मिलिमीटर पावसाची नोंद

दरम्यान, हंगामनिहाय विविध पिकांच्या शेती शाळेत शेतकऱ्यांना जमिन तयार करण्यापासून ते काढणीपश्चात तंत्रज्ञानाची प्रात्याक्षिकांसहची माहिती दिली जाते. चालू खरीप हंगामात करोनाच्या प्रादुर्भाचा काहिसा फटका या शेतीशाळांना बसला, परंतु त्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी क्राॅपसॅप अंतर्गत शारदा कृषी वाहिनीचा आधार महत्वपुर्ण ठरला. शेतकऱ्यांचे येणारे फोन, वरिष्ठ अधिकारी व सहकाऱ्यांचे प्रोत्साहनामुळे रेडीओद्वारे सुरू असलेली शेतीशाळा शेतकऱ्यांच्या घराघरात पोचत अल्याचे स्पष्ट होते, अशी माहिती कृषी सहाय्यक अधिकारी प्रतापसिंह शिंदे यांनी दिली.  यावेळी शेतकरी विवेक जगताप, मनोज पवार, योगेश जगताप, अमर कदम, सचिन मोटे, संग्राम जगताप, विश्वजित गायकवाड, किरण जगताप, संदीप कोकरे यांनीही वरील उपक्रम फायद्याचा असल्याचे म्हटले. दुसरीकडे, क्राॅपसॅप अंतर्गत ऊस पिक शेती शाळेचे पाच वर्ग आजवर यशस्वीरित्या पार पडले आहेत, यापुढील काळात पुढील पाच वर्गांची तयारी पुर्णत्वाला आली असल्याचे अधिकारी प्रतापसिंह शिंदे यांनी दिली. 

पुणे-मुंबईतील कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हेल्पलाइन; टाटा-सिप्लाचा उपक्रम​

शेती शाळेची वैशिष्ठ्ये -
शेतीच्या बांधावर प्रात्यक्षिकांद्वारे विविध तज्ञांचे मार्गदर्शन, ऊस पिकाची प्रत्यक्ष निरिक्षणे व उपायोजना, मित्र किटक व किड यातील फरक ओळखण्यास शिकविणे, एकात्मिक पिक व्यवस्थापनाची अंमलबजावणी करणे.

Edited By - Prashant Patil