शिवसेना ही दोन्ही काँग्रेसच्या दूधात साखर : सुुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 November 2020

सुळे म्हणाल्या, ''सरकार स्थापन झाल्यावर तीन महिन्यात कोरोनाचे महासंकट आले, अतिवृष्टी झाली. सरकारने संकटावर यश मिळविले आहे. पर्यटनात महारष्ट्र गुजरातपेक्षा आघाडीवर आहे. महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार विजयी करून एकी दाखवून द्या असे आवहान त्यांनी केले.

भुकूम : ''महाविकास आघाडीत शिवसेना दूधामध्ये साखर आहे. सरकारला एक वर्षे पुर्ण होत असून देशात राज्य अग्रेसर आहे. कठिण प्रसंगावर सरकारने यशस्वी मात केली आहे''असे मत खासदार सुप्रिया सुळेे यांनी भुकूम ( ता. मुळशी ) येथे व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाविकास आघाडीचे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अरूण लाड व शिक्षक मतदार संघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांची बैठक आयेजित केली होती. यावेळी प्रदिप गारटकर, रामचंद्र ठोंबरे, रमेश कोंडे, संग्राम मोहोळ, पाडूरंग ओझरकर, विजय केदारी, महादेव कोंढरे, दादा मोहोळ, गंगाराम मातेरे, राजेंद्र हगवणे,सविता दगडे, अंजली कांबळे, शंकर मांडेकर, महादेव कोंढरे, शांताराम इंगवले, सुभाष आमराळे, शांताराम जांभुळकर, संगिता पवळे उपस्थित होते. प्रास्ताविक सुनिल चांदेरे, राम गायकवाड, निलेश पाडाळे, अंकुश मोरे यांनी केले.

पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याची रंगीत तालीम पूर्ण; दिल्लीहून विशेष सुरक्षा पथके दाखल

सुळे म्हणाल्या, ''सरकार स्थापन झाल्यावर तीन महिन्यात कोरोनाचे महासंकट आले, अतिवृष्टी झाली. सरकारने संकटावर यश मिळविले आहे. पर्यटनात महारष्ट्र गुजरातपेक्षा आघाडीवर आहे. महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार विजयी करून एकी दाखवून द्या असे आवहान त्यांनी केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष रमेश कोंडे म्हणाले, तालुका उपसभापती निवडणूकीत शिवसेनेच्या उमेदवाराचे पक्षांतर राष्ट्रवादीत केले यापुढे असे होऊ नये अशी मागणी केली.''

भाजपचे राज्याचे अध्यक्ष व माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होतील असे विधान केले होते याबाबत प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या त्यांच्या शुभेच्छामुळे महाविकास आघाडीचे सरकार आगामी किमान पंचवीस वर्षे राहिल.

PM Vaccine Centres Visit : मोदींच्या पुणे दौऱ्याकडे जगाचे लक्ष; सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कडक बंदोबस्त
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supriya Sule giver statment about Shivashina, NCP, Congress Mahavikas Aghadi