esakal | दरेकरांना पुणेकरांचा इशारा; जाहीर माफी मागा अन्यथा...
sakal

बोलून बातमी शोधा

Punekar-Darekar

दरेकरांना पुणेकरांचा इशारा; जाहीर माफी मागा अन्यथा...

sakal_logo
By
अमित उजागरे

पुणे : सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसला आक्षेपार्ह शब्दांत टोला लगावला होता. यानंतर बराच गदारोळ झाला, भाजपनं नंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विंगनंही त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. आता लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यांनी दरेकरांना थेट इशाराच दिला आहे. एबीपी माझाशी त्या बोलत होत्या.

हेही वाचा: भारत ही लोकशाहीची मातृभूमी - PM मोदी

पुणेकर म्हणाल्या, "दरेकर बोलायला चुकले, कारण राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष नाही तर महिलांचा आदर करणारा पक्ष आहे. दरेकर तुम्ही फार चुकीचं बोलला आहात त्यामुळं जर तुम्हाला महिलांचा आदर करता येत नसेल तर त्यांची अवहेलना तरी करु नका. दरेकरांच्या या विधानाचा मी निषेध करते. प्रविण दरेकांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागितली नाही तर त्यांना हे महागात पडेल असा इशारा सुरेखा पुणेकर यांनी दिला आहे.

हेही वाचा: 'अल कायदा' पुन्हा अमेरिकेवर हल्ल्याच्या तयारीत - अमेरिकन गुप्तचर यंत्रणा

सुरेखा पुणेकर करणार राष्ट्रवादीत प्रवेश

लोककलावंत आणि लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. १६ सप्टेंबर रोजी पुणेकर राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करणार आहेत. दरम्यान, सुरेखा पुणेकर यांच्या पक्ष प्रवेशावरुन विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी एका जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसला आक्षेपार्ह भाषेत टोला लगावला होता.

हेही वाचा: टेलिकॉम क्षेत्रात मोठ्या सुधारणांना मंजुरी; Vodafone-Ideaला दिलासा

काय म्हणाले होते प्रवीण दरेकर?

"राष्ट्रवादी काँग्रेसला गरिबाकडं बघायला वेळ नाही. हा पक्ष रंगलेल्या गालांचा मुके घेणारा पक्ष आहे. सुभेदारांचा, कारखानदारांचा बँकांवाल्यांचा पक्ष, उद्यागपतींचा पक्ष आहे. तर भाजप हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे," असं दरेकर म्हणाले होते.

loading image
go to top