३०० पोलिसांची शोधमोहिम, वडिलांची फेसबुक पोस्ट अन् स्वर्णव सापडला

Full Story Of 4 Years Boy Kidnapped and Rescued
Full Story Of 4 Years Boy Kidnapped and Rescued
Summary

स्वर्णवच्या शोधासाठी जवळपास ३०० पोलिसांकडून शोधमोहिम सुरु होती. याबाबत गुप्तता पाळण्यात आली होती.

पुणे - गेल्या आठवड्यात ११ जानेवारी रोजी पुण्यातल्या (Pune) बालेवाडी हायस्ट्रीट परिसरातून स्वर्णव चव्हाण (Swarnav Chavan) या चार वर्षांच्या चिमुकल्याचं अपहरण झालं होतं. आठ दिवसांपासून पुणे पोलिस त्याच्या शोधासाठी दिवसरात्र एक करत होते. अखेर तो पुनावळेत सापडला असून सुखरुप आहे. त्याचं अपहरण कशासाठी, कोणी केलं याचा तपास सुरु आहे. दरम्यान, आपल्या मुलाची गेल्या आठ दिवसात वडील सतीश चव्हाण (Satish Chavan) यांना कोणतीच माहिती मिळत नव्हती. सोशल मीडियावरून त्यांनी अपहरण कर्त्याला आवाहन केलं होतं की, तुम्ही मागाल ते देतो पण आम्हाला फोन करा. त्यांची पोस्ट सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सकडूनही यावर प्रतिक्रिया येत होता.

अपहरणानंतर परिसरातील सीसीटीव्ही चेक करण्यात आले. तेव्हा त्यात स्वर्णवला एक व्यक्ती स्कूटीवरून नेत असल्याचं दिसलं होतं. हा फोटोही सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. संबंधित व्यक्ती किंवा गाडी ओलखीची असेल, अथवा याबाबत माहिती मिळाली तर ती कळवण्याचं आवाहनही करण्यात आलं होतं.

Full Story Of 4 Years Boy Kidnapped and Rescued
अपहरण झालेल्या मुलाला घरापर्यंत पोचवणारी व्यक्ती कोण? वाचा कसा सापडला 'डुग्गू '?

स्वर्णवचं अपहरण झाल्याचं समजल्यानंतर त्याच्या चौकशीसाठी सतीश यांना सातत्यानं फोन केले जात असतं. त्यावर त्यांनी फेसबुकवरून सतत अपडेट देताना अजुनही सापडला नसल्याचं सांगितलं. गेल्या चार ते पाच दिवसात त्यांनी फेसबुकवर स्वर्णवसोबतच्या आठणवणीही शेअर केल्या आहेत. आता स्वर्णवचा शोध लागला असून तो त्याच्या आईच्या कुशीत सुखरुप पोहोचला आहे.

स्वर्णवचे वडील सतिश चव्हाण यांनी सुरुवातीला फेसबुकवर असंही आवाहन केलं होतं की, स्वर्णवची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ४ वर्षे वयाच्या मुलासाठी कोणी औषधं आणण्यासाठी मेडिकल स्टोअरमध्ये आलं तर त्यावर लक्ष ठेवा, काही संशयास्पद वाटलं तर आम्हाला कळवा. यानतंर त्यांनी स्वर्णव कोणतं औषध घेतो हेसुद्धा सांगितलं होतं.

Full Story Of 4 Years Boy Kidnapped and Rescued
अपहरणकर्ता डुग्गुला सोडून कसा पळाला? व्हिडीओ Viral

दोनच दिवसांपूर्वी सतीश चव्हाण यांनी फेसबुकवर पोस्ट केली होती. १७ जानेवारीला सकाळी सातच्या सुमारास मुलाच्या अपहरणाने हतबल झालेल्या सतीश चव्हाण यांनी फेसबुकवर म्हटलं होतं की, माझा मुलगा डुग्गूबद्दल कुठलीही माहिती नाही. आम्हाला तो सापडला का, हे विचारायला कृपया फोन करु नका, कधी झालं, कसं झालं, अपहरण वगैरे वगैरे.. तुमच्याकडे कुठलीही माहिती असेल, तर प्लीज फोन करा. ज्या कोणी त्याला नेलंय, मला माझा मुलगा परत द्या, फक्त एकदा फोन करा, तुम्ही मागाल ते आम्ही देऊ, प्लीज आम्हाला फोन करा अशी विनंतही त्यांनी केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com