‘कोरोना’नंतर घ्या हृदयाची काळजी! तज्ज्ञांचा सल्ला

Heart-Care
Heart-Care

पुणे - तुम्हाला कोरोना झालेला? उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलेले? संसर्गाचे प्रमाण जास्त असल्याने अतिदक्षता विभागातही उपचार करावे लागले होते का? या प्रश्नांची उत्तरे ‘हो’ असल्यास तुम्हाला तुमच्या हृदयाची काळजी घ्यावी लागेल, असा सल्ला हृदयरोगतज्ज्ञांनी दिला आहे. कारण, कोरोनाचा थेट दुष्परिणाम हृदयावर होत असल्याची शास्त्रीय माहिती आता पुढे येत आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना हा श्‍वसनसंस्थेशी संबंधित आजार आहे. नाक आणि तोंडातून कोरोना विषाणूंचा संसर्ग शरीरात होतो. त्यातून हा विषाणू थेट फुप्फुसांवर हल्ला चढवतो. त्याचबरोबर या विषाणूंचा थेट परिणाम हृदयावरही होतो.

फुप्फुसांबरोबरच हृदयातही काही प्रथिने असतात. त्यांना हा विषाणू चिकटतो आणि हृदयात प्रवेश करतो. यातून विषाणूंचा हल्ला थेट हृदयावर होत असल्याचे दिसून आले, अशी माहिती आलोहा रुग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. ऋतुपर्ण शिंदे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

हृदयावर होणारा परिणाम

  • विषाणूंच्या संसर्गामुळे हृदयाला सूज येते. त्यातून हृदयाला आतून सूज येते. त्याला वैद्यकीय परिभाषेत मायोकार्डिटिस म्हणतात. 
  • त्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात. छातीत सतत दुखते, दम लागतो आणि रक्तदाब कमी होतो.
  • हृदयात रक्ताची गुठळी होते. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या मुख्य रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी झाल्यास त्यातून रुग्णाला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो.

हृदयविकाराच्या रुग्णाला कोरोना झाल्यास

  • रुग्णाला आधीचा हृदयविकार असल्यास तो कोरोनाच्या संसर्गामुळे वाढतो
  • हृदयविकारामुळे आधीच हृदय कमकुवत झालेले असते. त्यातच कोरोना झाल्याने उपचारातील गुंतागुंत वाढते. त्यामुळे मृत्यू होण्याचा धोका वाढतो.

कोरोनामुक्त झाल्यानंतरचे धोके

  • कोरोनातून बरे झाल्यानंतरही काही रुग्णांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्‍यता असते. कारण, कोरोनामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. त्याचा थेट परिणाम हृदयाच्या कार्यक्षमतेवर होतो. 
  • कोरोनामुक्त झाल्यानंतर तीन महिन्यांपर्यंत याचा धोका कायम राहतो.
  • कोरोनाचा संसर्ग जितका जास्त झालेला असेल, तितका धोका जास्त.
  • कोणतीही लक्षणे नसताना कोरोना झालेल्यांना हा धोका कमी असतो. पण, कोरोना संसर्गामुळे व्हेंटिलेटरवर उपचार घेऊन परत आलेल्या रुग्णांचा धोका जास्त असतो. 
  • दयाचे कार्य अचानक बंद होऊन रुग्णाचा मृत्यू होत असल्याचीही काही उदाहरणे आहेत. 

पोस्ट कोविड हृदयविकार कसा ओळखणार?

  • कोरोनानंतर हृदयावर नेमका कसा आणि किती परिणाम झालाय, याची माहिती हिमोग्राम, डी डायमर, सीआरपी अशा चाचण्यांतून स्पष्ट होते.
  • हिमोग्राममध्ये लिम्फोसाइट पेशी सातत्याने कमी होत असतील, तर तो कोरोनाचा दुष्परिणाम आहे.
  • शरीरात रक्ताची गुठळी झाली असल्यास डी डायमर टेस्ट पॉझिटिव्ह येते.

कोरोना होऊन जातो. पण, हृदयाला कायमस्वरूपी इजा राहते. त्याच्या अनुषंगाने दम लागणे, थोडे चालले तर दम लागणे, असे धोके वाढतात. हृदयाचे कार्य मंदावते. तसेच, काही रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होतात. यावर नियमित तपासण्या आणि वैद्यकीय सल्ल्याने प्रभावी उपचार आवश्‍यक ठरतात.
- डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयरोगतज्ज्ञ

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com