Rohit-Pawar
Rohit-Pawar

अघोषित शाळा, महाविद्यालयांना निधी घोषित करण्यासाठी शिक्षकांचे आमदारांकडे साकडे

पुणे - अघोषित कनिष्ठ महाविद्यालये, प्राथमिक व माध्यमिक शाळा, तसेच २०१२-१३ मधील वाढीव तुकडयांना दिवाळीपूर्वी निधी घोषित करण्यात यावा आणि शिक्षकांच्या खात्यात पगार जमा करावा, अशी मागणी मुव्हमेंट फॉर टिचर्स राईट्स संघटनेचे नितिन झणझणे व सहकारी शिक्षकांनी केली आहे. या मागण्यांचे निवेदन संघटनेच्या वतीने आमदार रोहित पवार यांच्याकडे देण्यात आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सप्टेंबर २०१९च्या शासन निर्णयानुसार घोषित केलेल्या एक हजार ६३८ कनिष्ठ महाविद्यालये आणि शाळांना मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार निधी वितरित करण्यात यावा, तसेच सेवा संरक्षण मिळावे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या प्रश्नावर आतापर्यंत खुप आंदोलने करूनही सरकारने अद्याप शिक्षकांची कोणतीच दखल घेतली नाही. सध्या तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना पगार नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची झाली आहे. परिणामी शिक्षकांचे जगणे अवघड झाले आहे.

सुद्धा मुश्किल झाले आहे,असे मत झणझणे यांनी व्यक्त केले. यावेळी संघटनेचे राज्य निरीक्षक पांडुरंग भोपळे, राज्य उपाध्यक्ष समाधान शिंदे, राज्य सल्लागार दादासाहेब गिरमकर, राज्य संघटक राहुल सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com