esakal | आम्हालाही विमा संरक्षण द्या; 'कोरोना योद्धा' म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांची मागणी!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-Survey

काही शिक्षक हे पोलिसांसोबत लॉकडाऊन काळात 'चेक पोस्ट'वर काम करत आहेत, त्यांनाही विमा कवच मिळावे, अशी अपेक्षा शिक्षकांमधून व्यक्त केली जात आहे.

आम्हालाही विमा संरक्षण द्या; 'कोरोना योद्धा' म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांची मागणी!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी आणि पोलिस यांच्याप्रमाणे त्यांच्याबरोबर कोरोना योद्धा म्हणून काम पाहणाऱ्या शिक्षकांना विम्याचे कवच देण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांसह संबंधित कर्मचाऱ्यांना पन्नास लाख रुपयांचे विमा कवच दिले आहे. तसेच ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्या यांना शासनाचे २५ लाख रुपयांचे विमा कवच आहे.

- '...आता फिराल का गाडी घेऊन?' विनाकारण गाडी घेऊन फिरणाऱ्यांसाठी पोलिसांची नामी शक्कल!

अनेक जिल्हा परिषदांनी शिक्षकांनासुद्धा ग्रामपंचायत पातळीवर कोरोना संदर्भात सर्वेक्षणाचे काम दिले आहे. शिक्षकांनी घरोघरी जाऊन घरातील कुटुंब प्रमुखांच्या तसेच सदस्यांची माहिती कुटुंबातील आजारी व्यक्तींची माहिती सर्दी, ताप, खोकला, थंडी तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा अशा गंभीर आजाराबाबत सर्वेक्षणाचे काम दिलेले आहे. काही शिक्षक हे पोलिसांसोबत लॉकडाऊन काळात 'चेक पोस्ट'वर काम करत आहेत, त्यांनाही विमा कवच मिळावे, अशी अपेक्षा शिक्षकांमधून व्यक्त केली जात आहे.

- सोशल मीडियात अफवा पसरवत असाल तर खबरदार...

शालेय शिक्षक नागनाथ विभुते म्हणाले, "कोरोनासारख्या अतिशय गंभीर अशा साथरोगाच्या सर्वेक्षणाचे काम करत असताना जीवाला धोका निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. शासकीय विमा कवचापासून शिक्षक वंचित राहण्याची शक्यता आहे. शिक्षक तसेच अन्य कोणत्याही कर्मचाऱ्यांना विमाकवच उपलब्ध असल्याचे आदेश शासनाने दिलेले नाहीत. इतरांप्रमाणे त्यांनाही हे विमाकवच मिळायला हवे.''

- चक दे इंडिया! सतत विरोधी भूमिका घेणाऱ्या देशांना औषधे पुरवतोय भारत!