लोक अदालतमध्ये मिटला भावा-बहिणीचा दहा वर्षांचा वाद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

फुरसुंगी येथील वडिलोपार्जित जमिनीत वाटा मिळावा, म्हणून बाळाबाई ऊर्फ पारूबाई बबन काळभोर यांनी अॅड. शिवाजीराव देशमुख यांच्यामार्फत न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यांच्या एका बहिणीचा मृत्यू झाला. मयत बहिणीच्या मुली प्रियांका योगेश गायकवाड आणि शीतल राहुल कटके याही वादी होत्या. 

पुणे : वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपावरून फुरसुंगीतील बहीण-भावांमध्ये गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेला वाद अखेर शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये मिटला. भावाने एका बहिणीला 11 गुंठे तर, मृत्यू झालेल्या दुसऱ्या बहिणीच्या दोन्ही मुलींना मिळून पाच गुंठे देण्याचे मान्य केले. संपत्तीवरून नात्यात निर्माण झालेला दुरावा दिवाणी न्यायाधीश व्ही. एम. कराडकर यांच्या पॅनेलने तडजोडी अंती दूर केला.

अभिनेत्री मानसी नाईकच्या विनयभंग प्रकरणी एकाला अटक

फुरसुंगी येथील वडिलोपार्जित जमिनीत वाटा मिळावा, म्हणून बाळाबाई ऊर्फ पारूबाई बबन काळभोर यांनी अॅड. शिवाजीराव देशमुख यांच्यामार्फत न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यांच्या एका बहिणीचा मृत्यू झाला. मयत बहिणीच्या मुली प्रियांका योगेश गायकवाड आणि शीतल राहुल कटके याही वादी होत्या. त्यांच्यावतीने अॅड. के. के. गवारे आणि अॅड. खंडेराव टाचले यांनी बाजू मांडली. रामभाऊ दौलत कामठे हे प्रतिवादी असून, त्यांच्या वतीने अॅड. यतीन येवले यांनी बाजू मांडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या वादातून वादी-प्रतिवाद दहा वर्षांपासून न्यायालयाच्या चकरा मारत होते. त्यानंतर 2017 मध्येही याबाबत अ्ॅड. देशमुख यांच्यामार्फत काळभोर यांनी त्यांचा हिस्सा वाटपाकरीता भावाविरूध्द दावा दाखल केला होता. या दाव्यात लोक अदालतमध्ये त्यांच्यात तडजोड झाली. त्यांना कल्पित विभाजनाप्रमाणे (नोशनल पर्टीशन) हिस्सा मिळाला आहे.

पुण्यातील गोल्ड जिमला ग्राहक मंचाचा दणका

भावासोबत नाते पुन्हा नव्याने निर्माण झाल्याचा आनंद वाटत असल्याचे बाळाबाई काळभोर यांनी यावेळी सांगितले. तर, बहिणीला जमीन दिल्याचा आनंद वाटत असल्याचे कामठे यांनी सांगितले.

डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळं त्या चिमुकल्याला मिळाला चेहरा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The ten years dispute is settled between Siblings in Lok Adalat at Pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: