'आरटीई'च्या राखीव जागांसाठी लवकरचं प्रवेश प्रक्रिया

rte
rtesakal media

पुणे : गेल्या तब्बल तीन महिन्यांपासून रखडलेल्या शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) असणाऱ्या २५ टक्के राखीव जागांवरील प्रत्यक्ष प्रवेशाचा मुहूर्त अखेर काढला आहे. आरटीई अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी एप्रिलमध्ये निवड यादी (लॉटरी) जाहीर केली होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे ही प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. मात्र, आता येत्या शुक्रवारपासून (ता.११) निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.

rte
पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांचीच सुरक्षा धोक्यात

आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांसाठी ७ एप्रिल रोजी सोडत काढली आहे. या सोडतीत निवड यादीत नाव असणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू करण्यात यावी. मात्र जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन ही प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याबाबतचा निर्णय आपल्या स्तरावर घेण्यात यावा आणि तशा सूचना प्रसिद्ध कराव्यात, अशी सूचना प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २० दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. निवड यादीतील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठीची तारीख आता आरटीई पोर्टलवर देण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुळ कागदपत्रे आणि छायांकित प्रती घेऊन संबंधित शाळेत जाऊन पाल्याचा तात्पुरता प्रवेश निश्चित करायचा आहे. परंतु कोरोनामुळे प्रत्यक्षरित्या शाळेत प्रवेशासाठी येऊ न शकणाऱ्या पालकांनी दिलेल्या मुदतीत दुरध्वनीद्वारे, व्हॉटस्‌ॲपद्वारे शाळेत संपर्क साधून प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करावी, अशा स्पष्ट सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिल्या आहेत.

rte
पुणे विस्तारणार! महिनाभरात २३ गावे महापालिकेत समाविष्ट होण्याची शक्यता

निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेश घेण्याचा कालावधी संपल्यानंतर शाळांमधील रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्राधान्य देण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर सूचना त्यावेळी आरटीई पोर्टलवर देण्यात येतील. शाळेत प्रवेश मिळावा म्हणून अनेक पालक आरटीई प्रवेश अर्ज भरताना चुकीचे अंतर दाखवितात. त्यामुळे रहिवासी पत्याचा पुरावा आणि इतर कागदपत्रांवरून शाळा व निवासी पत्त्याच्या अंतराची पडताळणी करावी. निवड यादीतील मुलांबाबत चुकीचे अंतर दाखविल्याचे निदर्शनास आल्यास शाळेने तात्पुरता प्रवेश देऊ नये. अशा पालकांना तालुकास्तरीय समिती, शिक्षणाधिकारी यांच्याकडे अर्ज करण्यास सांगावे, असे जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

rte
पुणे : शंखीगोगलाईंनी रात्रीतूनच केलं शेत फस्त!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com