esakal | दुसऱ्या फेरीतील गुणवत्ता यादी शनिवारी होणार जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

admission

दुसऱ्या फेरीतील गुणवत्ता यादी शनिवारी होणार जाहीर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतंर्गत दुसऱ्या नियमित फेरीतील अंतिम गुणवत्ता यादी शनिवारी (ता.४) सकाळी दहा वाजता जाहीर होणार आहे. त्यामुळे पहिल्या फेरीत पसंतीचे महाविद्यालय न मिळालेल्या आणि दुसऱ्या फेरीतील प्रवेशाच्या आणि ‘कट-ऑफ’च्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांची शिगेला पोचलेली उत्सुकता शनिवारी संपणार आहे.

हेही वाचा: इंदापूर : ...अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेतंर्गत प्रवेशाच्या दुसऱ्या फेरी जाहीर झाली आहे. या फेरीसाठी आलेल्या अर्जावर डेटा प्रोसेसिंग आणि गुणवत्ता यादी तयारी करण्याचे कामकाज शुक्रवारी करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या नियमित फेरीतील गुणवत्ता यादी शनिवारी जाहीर होणार आहे. या यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एसएमएस पाठविणे, स्टुंडट लॉगिनमध्ये ॲलॉट झालेल्या महाविद्यालये दिसणे, तसेच महाविद्यालयांना निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे शनिवारी दिसू शकणार आहेत.

हेही वाचा: शिवणेतील दांगट पाटील नगर येथे अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा.

आतापर्यंत झालेल्या प्रवेशाची आकडेवारी :

 • एकूण प्रवेश क्षमता : १,१२,७२५

 • झालेले प्रवेश : ३०,८१५

 • रिक्त जागा : ८१,९१०

केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी झालेले विद्यार्थी :

 • नोंदणी केलेले विद्यार्थी : ८३,८०२

 • अर्ज लॉक झालेले विद्यार्थी : ७५,९१७

 • व्हेरिफाय झालेले अर्ज : ७५,५१६

 • पर्याय भरलेले विद्यार्थी : ६८,९२५

हेही वाचा: पुणे : कंपनीचे तीन कोटी ६८ लाख स्वतःच्या खात्यात वळविले

दुसऱ्या नियमित फेरीचे वेळापत्रक :

तपशील : कालावधी

 • दुसऱ्या नियमित फेरीतील अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करणे : ४ सप्टेंबर

 • विद्यार्थ्यांना महाविद्यालये ॲलॉट होणे, महाविद्यालयांना निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे दिसणे, दुसऱ्या फेरीतील ‘कट-ऑफ’ जाहीर होणे, विद्यार्थ्यांना प्रवेशाचा एसएमएस जाणे : ४ सप्टेंबर

 • महाविद्यालये ॲलॉट झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ‘प्रोसिड फॉर ॲडमिशन’वर क्लिक करणे, प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र अपलोड करणे, प्रवेश निश्चित करणे : ४ ते ६ सप्टेंबर

 • कनिष्ठ महाविद्यालयांनी दुसऱ्या फेरीतील प्रवेश झाल्यानंतर रिक्त जागांचा तपशील संबंधित संकेतस्थळावर अपलोड करणे : ६ सप्टेंबर

 • रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे : ६ सप्टेंबर

loading image
go to top