Theft of one and a half lakhs by entering the house through the open door at Mundhwa In pune
Theft of one and a half lakhs by entering the house through the open door at Mundhwa In pune

पुणे : नजरचुकीने उघडा राहिला दरवाजा अन् चोरट्यांनी हाथ साफ केला

पुणे : नजरचुकीने उघडा राहीलेला दरवाजा पाहून घरात घुसलेल्या चोरट्यांनी घरातील रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने असा तब्बल अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना रविवारी पहाटे मुंढव्यातील वाडेकर आळीमध्ये घडला. 

पुणे- नाशिक रस्त्याची वाहतूक कोंडी सुटणार कधी...

याप्रकरणी कमलाकर गायकवाड (वय 25 रा. मुंढवा) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यासह 'या' पाच ठिकाणी असणार एसटीच्या 'ई-बस चार्जिंग स्टेशन...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कुटुंबीय शनिवारी रात्री जेवण करुन झोपले. मात्र ते घराचा दरवाजा लावण्यास विसरून गेले. त्यामुळे दरवाजा उघडा राहीला. दरम्यान, पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून घरामध्ये प्रवेश केला. त्यानंतर घरात ठेवलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल असा अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला. दरम्यान, रविवारी सकाळी झोपेतुन उठल्यानंतर घरामध्ये चोरी झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक ए.जी. गवळी करीत आहेत. 

धरण होऊन नऊ वर्षे झाली, पण पाण्याचा पत्ताच नाही... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com