रेल्वे प्रवाशांच्या हातावर काठी मारुन मोबाईल चोरणाऱ्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 2 February 2020

रेल्वे प्रवाशांच्या हातावर काठीने फटका मारून फटका मारुन मोबाईल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांना रेल्वे पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून 56 हजार रुपये किंमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले. लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

पुणे : रेल्वे प्रवाशांच्या हातावर काठीने फटका मारून फटका मारुन मोबाईल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांना रेल्वे पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून 56 हजार रुपये किंमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले. लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अफजल शहाबुद्दीन शेख उर्फ भुऱ्या (वय 20, रा. सिंहगड कॉलेज रोड, कुसगाव बुद्रुक, लोणावळा), ओंकार अनिल तिकोणे (वय 20, रा. दत्तवाडी लोणावळा व तेजस राजेश मोहिते (वय 20, रा. गवळीवाडा, लोणावळा) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीमध्ये प्रवाशांच्या हातावर काठीने फटका मारुन त्यांचे मोबाईल चोरी करण्याच्या प्रकारामध्ये वाढ झाली होती.

पाकिस्तानीच म्हणतात, 'सरकार लाज वाटू द्या, भारताकडून काहीतरी शिका'

संबंधित प्रकारांवर आळा घालण्याबाबतचे आदेश लोहमार्ग पोलिस अधिक्षक दिपक साकोरे यांनी दिले होते. त्यानुसार, लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाकडून गुन्ह्यांचा शोध घेतला जात होता. त्यावेळी लोणावळा येथील सराईत गुन्हेगार भुऱ्या, त्याचा साथीदार तिकोणे व मोहिते हे तिघेजण या स्वरुपाचे गुन्हे करीत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिस निरीक्षक मौला सय्यद, सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल पाटोळे, पोलिस उपनिरीक्षक कमलेश मुन्नास्वामी, पोलिस कर्मचारी अमरदीप साळुंके, इम्तियाज आवटी, सचिन पवार, दिलीप खोत यांच्या पथकाने लोणावळा येथे सापळा रचून तिघांना अटक केली. तिघांपैकी भुऱ्याविरुद्ध लोणावळा ग्रामीण, शहर व नवी मुंबई येथे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो दरवेळी नवीन साथीदार घेऊन गुन्हे करीत होता.

पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी वर्षाला होतात तब्बल एवढे कोटी रुपये खर्च

शिवाजीनगर भागातील शाहरूख खरादी हा देखील रेल्वे प्रवाशांच्या हातावर काठी मारून त्यांच्या मोबाईलची चोरी करीत असे. त्यास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर बांडे, पोलिस कर्मचारी भीमाशंकर बमनाळीकर यांच्या पथकाने अटक केली. तर लोहमार्ग प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.एम.राऊत यांनी खरादी यास चार महिने कारावास व दोन हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thief arrested under crime of railway passengers mobile stolen