Pune : खवले मांजराची तस्करी करणारी टोळी जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

तुषार अल्हाट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सकाळी सहा वाजता खराडी येथील प्राईड हॉटेलच्या मागील मैदानात बनावट ग्राहकाचा बनाव रचला आणि या टोळीशी संपर्क साधला.

वडगाव शेरी : दुर्मिळ खवले मांजराची तस्करी करणाऱ्या टोळीला शनिवारी (ता.12) सकाळी चंदननगर पोलिसांनी रंगेहात पकडले. या टोळीने हे खवले मांजर कोकणातून खराडी येथे विक्रीसाठी आणले होते. याप्रकरणी जितेंद्र शिवराम मोहिते (वय 32 रा. श्रीवर्धन, रायगड), योगेश यशवंत पाटील (वय 30, रा. दिवेआगार, रायगड), कुमार यशवंत सावंत (वय 46, रा. चिंचवडगाव, कोल्हापूर) यांना अटक करण्यात आली आहे.

या टोळीतील आरोपींनी हे मांजर कोकणातून पकडून आणून अगोदर सातारा येथे नेले. तेथून ते विक्रीसाठी पुण्यात आणले. ही टोळी मांजर विक्रीसाठी पुण्यात येणार असल्याची बातमी पोलीस कर्मचारी तुषार आल्हाट यांना अगोदर समजली होती. या माहितीवरून तुषार अल्हाट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सकाळी सहा वाजता खराडी येथील प्राईड हॉटेलच्या मागील मैदानात बनावट ग्राहकाचा बनाव रचला आणि या टोळीशी संपर्क साधला.

- युतीत तुझी थाळी विरुद्ध माझी थाळी.. तुम्हाला पचतेय का तुमचं तुम्ही ठरवा!

सदर टोळीकडे दुर्मिळ खवले मांजर असल्याची खात्री पटल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके, पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांच्या नेतृत्वाखाली अजित धुमाळ, श्रीकांत गांगुर्डे, दत्ता शिंदे, परशुराम शिरसाट, तुषार भिवरकर या पोलीस कर्मचाऱ्यांनी टोळीतील आरोपींना ताब्यात घेतले.

- Vidhan Sabha 2019 : 'तुमचा बाप आला तरी...'; मुख्यमंत्र्यांना मनसैनिकांचा इशारा

त्यानंतर हे खवले मांजर वन्यजीव अनाथालयाचे संचालक अनिल खैरे यांच्या ताब्यात देण्यात आले. सदर मांजराचे वय तीन वर्षे असून त्याचे वजन साडेआठ किलो आणि त्याची लांबी 50 इंच इतकी आहे. या मांजराला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी किंमत मिळते. तसेच औषधातील वापरासाठीही खवले मांजराची तस्करी करण्याचे प्रकार अलीकडील काळात वाढले आहेत.

- 'पुरे झालं हिंदू-मुस्लिम राजकारण, मी हे थांबवणार' : इजाझ खान


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three arrested for smuggling of pangolin in Pune