पुण्यात 3 दिवसीय देशी गोवंश जागतिक परिषदेचे आयोजन

Three day World Cow Conference 2019 at pune.png
Three day World Cow Conference 2019 at pune.png

पुणे : कामधेनू सेवा प्रतिष्ठानतर्फे (शुक्रवार) २९ ते १ डिसेंबर २०१९ या कालावधीत ‘वर्ल्ड काऊ कॉन्फरन्स अँड अॅग्री एक्स्पो’ अर्थात देशी गोवंश जागतिक परिषदेचे आयोजन पुणे येथे करण्यात आले आहे. बालेवाडी रोड, ग्यानबा सोपानराव मोझे कॉलेज समोर शुक्रवारी सकाळी दहा वाजता राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष डॉ. वल्लभभाई कथीरिया यांच्या हस्ते या परिषदेचे उद्‌घाटन होणार आहे.  या परिषदेचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.विजय भटकर भूषविणार आहेत, तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार गिरीष बापट, आमदार चंद्रकांत पाटील आणि एमआयटीचे उपाध्यक्ष राहुल कराड उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कामधेनु सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक रत्नपारखी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

भाजपच्या हातून सत्ता गेल्याने पुणे महापालिकेतही 'हे' मोठे बदल

 राष्ट्रीय कामधेनु आयोगाचे अध्यक्ष डॉ. वल्लभभाई कथीरिया, ‘वर्ल्ड काऊ कॉन्फरन्स अँड अॅग्री एक्स्पो’चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.विजय भटकर, कामधेनू सेवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विजय ठुबे, सचिव समीर देवधर, सल्लागार मिलिंद देवल उपस्थित होते. ‘वर्ल्ड काऊ कॉन्फरन्स अँड अॅग्री एक्स्पो’ अर्थात देशी गोवंश जागतिक परिषदेमध्ये गोपालन आणि त्याच्याशी संबंधित भारतातील तसेच अमेरिका, ब्राझील, स्वीडन आणि कॅनडामधील पशूतज्ज्ञ आणि गोवंश अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत.

दिराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची विष घेऊन आत्महत्या  

यानिमित्त आयोजित गो-प्रदर्शनामध्ये भारतातील तीस जातीवंत देशी गोवंश पहायला मिळणार आहेत. या तीन दिवसीय परिषदेत भारतातील सर्व गोवंशांचा परिचय, आदर्श गोपालकांच्या मुलाखती, ए-२ मिल्कचे महत्त्व, दुग्धजन्य उत्पादनांची निर्मिती, गोआधारित कृषी उत्पादनांची निर्मिती, गोआधारित मानवी आरोग्य विषयक उत्पादनांची निर्मिती, गोपालनामधील नवीन क्षितीजे, शुद्ध आणि उच्च गोवंश निर्मिती व पैदास धोरण, नंदी शाळा, स्वयंपूर्ण गोशाळ आणि सामाजिक दायित्व अशा विविध विषयांवर मार्गदर्शन, चर्चा आणि व्याख्याने होणार आहेत. गोपालन व्यवसायाला सन्मान प्राप्त करून या क्षेत्राकडे पाहण्याचा नवीन पिढीचा दृष्टिकोन विकसीत करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे.

भाजपच्या हातून सत्ता गेल्याने पुणे महापालिकेतही 'हे' मोठे बदल
  
भारतीय गोवंशाला गतवैभव प्राप्त करून देणे हा या परिषदेचा मूळ हेतू आहे. विज्ञानाच्या शास्त्रीय कसोट्यांवर भारतीय गोवंशाची गाय सिद्ध झाली असून ही सिद्धता तळागाळातील शेतकरी आणि गोपालकांपर्यंत तसेच सर्वच क्षेत्रातील नवीन पिढीपर्यंत पोचविण्याच्या उद्देशाने या तीन दिवसीय परिषदेचे आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.  गोपालक आणि गोशाळा यांना संघटीत करणे, गोशाळांचे आर्थिक सक्षमीकरण करणे, शुद्ध आणि उच्च दर्जाच्या गोवंशाची निर्मिती करणे असे विविध उद्देश डोळ्यासमोर ठेवून या परिषदेची आखणी करण्यात आली आहे.  या परिषदेच्या माध्यमातून भारतीय गोवंश संदर्भात जागतिक पातळीवर सुरु असलेले संशोधन स्थानिक पातळीवरील गोपालकांपर्यंत  पोचविण्यात येणार आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com