

आळंदी, ता. १९ : विकासात्मक दृष्टिकोन ठेवून काम करणाऱ्या आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांची पदोन्नतीद्वारे बदली झाली. त्यांची नियुक्ती लातुर महानगरपालिकेत उपायुक्त म्हणून झाली, तर त्यांच्या जागी आळंदी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी नातेपुते नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांची नेमणूक केली आहे. तसेच, चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांची बदली विभागीय आयुक्त कार्यालयात सहायक आयुक्त म्हणून झाली असून, त्यांच्या जागी नवी मुंबईतील सहायक आयुक्त अंकुश जाधव यांची करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश गुरुवारी (ता. १९) मंत्रालयातून नगरविकास विभागातील उपसचिव प्रियांका कुलकर्णी छापवाले यांनी काढला आहे.
आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी केंद्रे यांच्या बदलीबाबतची चर्चा मागील एक महिन्यांपासून सुरू होती. मागील दोन वर्षे त्यांनी आळंदीत विकासात्मक दृष्टिकोन ठेवून अनेक कामे केली. यामध्ये मुख्यत्वेकरून रस्ते, गार्डन, चौक सुशोभीकरणाची उल्लेखनीय कामे केली. मात्र, पाणीपुरवठ्याबाबत त्यांना अपयश आले. त्यामुळे नातेपुते नगरपंचायतीमधून बदली होऊन येणाऱ्या खांडेकर यांच्यावर मुख्यत्वेकरून दैनंदिन पाणीपुरवठा करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
चाकण नगरपरिषद मुख्याधिकारी भोसले हेही नुकतेच रुजू झाले होते. जेमतेम कालावधी मिळाला तरी त्यांचीही कामगिरी चांगली राहिली आहे. त्यांच्या जागी नवी मुंबईतील सहायक आयुक्त अंकुश जाधव यांची नेमणूक झाली आहे. त्यांनी आळंदी नगरपरिषद व पिंपरी महापालिकेतही काम केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.