लाईव्ह न्यूज

छतावरील सौर प्रकल्पासाठी ‘जनसमर्थ’चे बळ

छतावरील सौर प्रकल्पासाठी ‘जनसमर्थ’चे बळ
Published on: 

बारामती, ता. २९ : इच्छा असूनही पैशाअभावी घराच्या छतावर सौर प्रकल्प बसविण्यात असमर्थ ठरणाऱ्या वीजग्राहकांसाठी केंद्रसरकारने ‘जनसमर्थ’चे बळ देऊ केले आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेसाठी एका क्लिकवर ‘जनसमर्थ पोर्टल’द्वारे ९० टक्के कर्ज मिळवता येते आणि ७८ हजारांचे अनुदान दिले जाते. विशेष म्हणजे सौर प्रकल्पासाठी सात टक्क्यांपेक्षा कमी व्याजदराने तातडीने कर्ज मिळते.

ज्या ग्राहकांचा वीजवापर ३०० युनिट इतका आहे, त्यांच्यासाठी तीन किलोवॅट क्षमतेचा सूर्यघर प्रकल्प पुरेसा आहे. यातून महिन्याला सरासरी ३०० ते ३५० युनिट वीज तयार होते. या क्षमतेचा प्रकल्पासाठी सरासरी दोन लाख रुपये खर्च येतो. तीन किलोवॅट प्रकल्पाला केंद्र सरकारकडून ७८ हजारांचे अनुदान मिळते.

पीएम-सूर्यघर प्रकल्पासाठी कर्ज हवे असल्यास सर्वप्रथम निवडसूचीतील ठेकेदाराकडून सूर्यघर प्रकल्पाचे कोटेशन घ्यावे. त्या महावितरणच्या https://www.mahadiscom.in/ismart/ या पोर्टलवर १२ अंकी वीजग्राहक क्रमांक टाकून व ठेकेदाराची निवड करुन कोटेशन अपलोड करावे. नोंदणी पूर्ण झाल्याचा एसएमएस दिलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त होईल.

सूर्यघरची नोंदणी पूर्ण झाल्यावर https://www.jansamarth.in/register पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी. विचारलेली माहिती भरल्यावर विविध राष्ट्रीयकृत बँका व त्यांचे व्याजदर समोर येतील. ग्राहकाने त्याच्या सोयीनुसार बँक व शाखा निवडावी. SMS वर मिळालेला नोंदणीक्रमांक योग्य ठिकाणी टाकून माहिती भरावी. व्हेरिफिकेशन पूर्ण करुन बँक कर्ज मंजूर करते. ठेकेदाराने काम पूर्ण केल्यावर महावितरणकडून पडताळणी होते व दिलेल्या बँक खात्यावर काही दिवसांत ७८ हजारांची सबसिडी जमा होते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com