
मंचर, ता.१६: ‘‘जल संपदा विभागाची प्रतिमा लोकाभिमुख आणि चांगल्या पद्धतीची होण्यासाठी शेतकऱ्यांबरोबर संवाद वाढला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांनी पाणीपट्टी नियमित भरून शासनास सहकार्य केले आहे त्यांना पैसे भरल्याच्या पावत्या वेळेत पोच करा. जेणेकरून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन होऊन पुढील पाणीपट्टी वसुलीस सहकार्य मिळेल. उपसा सिंचन पाणी परवानगी मागणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे पाणी परवाने येत्या १५ दिवसात द्यावेत,’’ अशी सूचना हुतात्मा बाबू गेनू सागरचे (डिंभे धरण) कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांनी सांगितले.
निघोटवाडी-मंचर (ता.आंबेगाव) येथे मंगळवारी (ता.१५) महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग, कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत कुकडी प्रकल्प डिंभे धरण विभाग यांच्यावतीने जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५ प्रारंभप्रसंगी कडुसकर बोलत होते. सुरुवातीला सामूहिक जलप्रतिज्ञा घेण्यात आली.
यावेळी उपविभागीय अधिकारी स. तु. देवरे, दत्ता कोकणे, दि. भा. गोडे, आर. आर. अदलिंगे,एस. बी. गोसावी, जलसंपदा विभागातील कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.
यावेळी कडुसकर म्हणाले की, पंधरवड्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे भूसंपादनाबाबत काही प्रलंबित प्रश्न असतील ते प्राधान्याने सोडवून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा. दरम्यान, जयश्री रोकडे यांनी सूत्रसंचालन तर शशिकांत माने यांनी आभार मानले.
आंबेगाव, जुन्नर, शिरूर, पारनेर, श्रीगोंदा या तालुक्यातील नद्या, धरणे, कालवे, चाऱ्यामध्ये नागरिक कचरा टाकतात, अनेक व्यावसायिक दूषित सांडपाणी सोडतात. त्यामुळे पिण्याचे पाणी दूषित होते. याबाबत प्रथम जनजागृती करून समज द्या.अन्यथा संबंधितांच्या विरोधात कडक कारवाई करावी लागेल.
- प्रशांत कडुसकर, कार्यकारी अभियंता हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरण)
13012
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.