Student_Exams
Student_Examssakal

दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाइनच!

कोरोनाच्या संसर्ग वाढत असल्यामुळे शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत

पुणे : विद्यार्थ्यांनो, तुम्ही दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत आहात का!, मग इकडे लक्ष द्या. परीक्षेबाबत मनात कोणताही संभ्रम ठेवू नका. कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद असली, तरीही परीक्षेची तयारी जोमाने करा. बोर्डाच्या परीक्षा दरवर्षीच्या प्रचलित पद्धतीने म्हणजेच ऑफलाइन पद्धतीनेच यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत.
होय, कोरोनाच्या संसर्ग वाढत असल्यामुळे शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. परंतु दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइन(Tenth-twelfth exam offline) पद्धतीनेच होतील, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (Maharashtra State Board Of Secondary And Higher Secondary Education) सांगण्यात आले आहे. त्यामुळे या परीक्षांबाबत विद्यार्थी-पालकांनी मनात कोणताही संभ्रम न ठेवता परीक्षेची तयारी करावी, असा सल्ला देण्यात येत आहे. (offline exam)

Student_Exams
देशात कोरोनाचा स्फोट; PM मोदींची सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

‘‘देशभरात कोणत्याही राज्याचे बोर्ड असो वा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) असो यांच्याकडे बोर्डाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी सक्षम अशी कोणतीही यंत्रणा नाही. परीक्षेचे स्वरूप, व्याप्ती, विषय, विद्यार्थ्यांची संख्या पाहता बोर्डाची परीक्षा ऑनलाइन घेणे शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मनात कोणतीही शंका आणू नये. बोर्डाची परीक्षा ही प्रचलित पद्धतीने ऑफलाइनच होणार आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा होणार असून परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल केलेला नाही,’’ असे मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले आहे.(Tenth twelfth exam news)

विद्यार्थ्यांची संख्या (अंदाजे)
दहावी : १६,१९,०००
बारावी : १४,५७,०००

Student_Exams
PM मोदींची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, राज्यांसाठी नव्या सूचना?

अशी करा परीक्षेची तयारी
- लेखनाचा सराव करा
- सराव प्रश्नपत्रिका वेळेत पूर्ण करण्याचा हवा सराव
- स्व:अध्ययनावर द्या भर
- वर्षभर केलेल्या अभ्यासक्रमाची करा उजळणी
- न समजलेल्या अभ्यासक्रमाबाबत शिक्षकांची करा चर्चा

Student_Exams
भारत-पाकिस्तान फाळणीत झाली ताटातूट, तब्बल 74 वर्षांनंतर भेट!

विद्यार्थ्यांची विभागवार संख्या (डिसेंबरपर्यंत)
विभाग : दहावी : बारावी
पुणे : २,६०,४५५ : २,३९,७१९
नागपूर: १,४९,८०२ : १,५९,७४०
औरंगाबाद : १,६६,५४६ : १,५९,६०८
मुंबई : ३,४७,७९० : ३,१५,४१३
कोल्हापूर : १,२९,३२१ : १,२१,६६४
अमरावती : १,४९,४८८ : १,५१,६०८
नाशिक : १,८९,९३० : १,५९,९२६
लातूर : १,०४,१९३ : ९०,१५२
कोकण : ३०,२३६ : २९,१५०

दहावी-बारावीच्या परीक्षा बोर्डाने यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार होणार आहेत, त्यात सध्यातरी कोणताही बदल केलेला नाही. बोर्डाची परीक्षा ऑफलाइन घेण्यावर राज्य शिक्षण मंडळ ठाम आहे. अपवादात्मक परिस्थिती उद्भवल्यास त्या-त्या वेळी राज्य सरकारच्या निर्णयानुसार योग्य तो बदल घेण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यात येणार आहे.
- शरद गोसावी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

Student_Exams
कोरोना योद्धा : तब्बल महिनाभरानं झाली माय-लेकरांची भेट!

दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा या प्रचलित पद्धतीनेच म्हणजे ‘ऑफलाइन’ पद्धतीनेच होणार आहेत. त्यादृष्टीनेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतली जात आहे. त्यामुळे पालक-विद्यार्थ्यांनी परीक्षेबाबत संभ्रम निर्माण करून घेऊ नये. दरवर्षीप्रमाणे ही परीक्षा लेखी स्वरूपात घेतली जाणार आहेत. सध्या शाळांमध्ये सराव परीक्षा सुरू असून काही ठिकाणी विद्यार्थ्यांकडून लेखनाचा सराव करून घेण्यात येत आहे. अंतर्गत मूल्यमापन, स्वाध्याय प्रकल्प, नोंद वह्या पूर्ण करणे, प्रात्यक्षिक परीक्षेचा सराव, प्रभावी लेखन ही तयारी शाळांनी सुरू केली आहे.

- महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ता, मुख्याध्यापक महामंडळ

Student_Exams
भारत-पाकिस्तान फाळणीत झाली ताटातूट, तब्बल 74 वर्षांनंतर भेट!

शाळांमध्ये दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी करून घेतली जात आहे. परंतु आता पुन्हा शाळा बंद झाल्याने यात खंड पडला आहे. किमान दहावी-बारावीचे वर्ग नियमितपणे सुरू ठेवा, किंवा या विद्यार्थ्यांची दिवसाआड शाळा भरविण्यात यावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा मार्च-एप्रिल दरम्यान परीक्षा होणार आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्यास या विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी अधिक चांगल्याप्रकारे करता येणार आहे.
- हरिश्चंद्र गायकवाड, अध्यक्ष, पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com