Job Openings
Job OpeningsSakal Digital

पुणे : नवीन वर्षात IT क्षेत्रात नोकरीची संधी, अशी होते नोकर भरती

पुणे : कोरोनामुळे लॅकडाउन लावले होते. अनेकांना घराबाहेर पडता आले नाही. याचदरम्यान माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राचे महत्त्व वाढले. त्यातून अनेक ॲप निर्माण झाले. मात्र, तेवढ्या प्रमाणात कौशल्य असलेले मनुष्यबळ मिळू शकले नाही. त्यामुळे आयटी क्षेत्रात पुढच्या सहा महिन्यांत मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी निर्माण होणार आहेत, असे गेल्या वीस वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असणारे, तसेच आयटीविषयी मार्गदर्शन करणारे राकेश भंडारी यांनी सांगितले. (Job Openings In IT Companies in Pune)

आजच्या आधुनिक जगात आयटी क्षेत्राचे महत्त्व वाढले आहे. तसेच, दिवसेंदिवस याचे महत्त्व वाढत जाणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात नोकरीच्या संधी वाढणार असून, त्यासाठी केवळ अभियांत्रिकीचीच शाखा असली पाहिजे, असे काही नाही. विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेतील पदवी असली आणि आयटी नोकरीसाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण आणि कौशल्ये आत्मसात केली, की नोकरीची संधी आपल्यासमोर उपलब्ध आहे, असे भंडारी म्हणाले.

Job Openings
LinkedIn Report: भारतातील ८२ टक्के कर्मचारी नोकरी बदलण्याच्या विचारात

आयटी क्षेत्रात नवनवीन कल्पनांना वाव असतो. त्यामुळे कोणीही त्या कल्पना मांडू शकतो. ती कल्पना कागदावर मांडून त्यावर संशोधन केले जाते. हे काम डेव्हलपर्स करतो आणि त्यातून एखादे सॉफ्टवेअर प्रत्यक्षात निर्माण होते. कल्पना सुचण्यासाठी तुम्ही कोणत्या शाखेचे आहात? हा प्रश्न येत नाही. त्यामुळे या आयटी क्षेत्रात काम करण्याची सुरुवात कधीही करता येऊ शकते. या बाजारात हजारो कौशल्ये आधारित कोर्सेस उपलब्ध आहेत. मात्र, यासाठी संगणकीय भाषेचे ज्ञान आवश्यक असते. सोप्या भाषेचे ज्ञान घेऊन आयटीत कामाची सुरुवात करता येते. अनुभवाने ज्ञान वाढते, त्यामुळे एकदा पाया पक्का होणे आवश्यक असते. ज्यांना क्षेत्रात यायचे आहे, त्यांनी आतापासूनच सुरुवात केली पाहिजे, असे या क्षेत्रातील मार्गदर्शक मंगेश भंडारी यांनी सांगितले.

कोठूनही घेता येऊ शकते ज्ञान...
आता कोरोनाने सर्वांनाच घरातून काम करण्याचे शिकवले आहे. त्यात शिक्षणही आता ऑनलाइन झाले आहे. त्यामुळे आपण जेथे कोठे आहोत तेथूनच ऑनलाइन कोर्स करता येतात. तसेच, नोकरी शोधत फिरत बसण्याची ही गरज नाही. कारण, ऑनलाइनच मुलाखत देता येते. नोकरी लागली, की कंपनीच घरी लॅपटॉप पाठवते. त्यामुळे घर बसल्या पुढील सहा महिन्यांत आवश्यक कौशल्ये आत्मसात केली, तर नक्कीच या संधीचा फायदा घेता येऊ शकेल. पगार अपेक्षेपेक्षा अधिक मिळू शकतो, असे आयटीतील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Job Openings
जॉब इंटरव्ह्यू देण्याआधी जाणून घ्या खास गोष्टी

पुण्यातील आयटी कंपन्यांची स्थिती...
- पाचशेहून अधिक नामंकित कंपन्या
- दीडशेहून अधिक सर्वसाधारण कंपन्या

अशी होते नोकर भरती...
- दर तीन महिन्याला १५ हजार जागांसाठी भरती
- वर्षाला एकूण ४५ हजार पदांची भरती

आयटी कंपन्या कुठे...
- खराडी आयटी पार्क
- हिंजवडी
- मगरपट्टा
- येरवडा
- कल्याणीनगर
- विमाननगर
- फुरसुंगी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com