new katraj tunnel accident

new katraj tunnel accident

esakal

Katraj Tunnel Accident: नवीन कात्रज बोगद्यात दुचाकी घसरून युवकाचा मृत्यू, वाहतुकीच्‍या नियमांकडे दुर्लक्ष अन्..

Pune- Satara Highway Accident near Navale Bridge: दुचाकी घसरून सहप्रवासी युवकाचा मृत्यू, आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल
Published on

पुणे, ता. १६ : वाहतुकीच्‍या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने दुचाकी घसरून सहप्रवासी युवकाचा मृत्यू झाला. ही घटना मुंबई-बंगळूर बाह्यवळण मार्गावरील नवीन कात्रज बोगद्यात २७ ऑक्‍टोबरला घडली. यामध्‍ये दुचाकीचालक तरुण जखमी झाला. याप्रकरणी मृत्‍यू झालेल्‍या युवकाच्‍या आईच्‍या तक्रारीवरून आंबेगाव पोलिसांनी दुचाकीस्वारावर गुन्‍हा दाखल केला आहे.

<div class="paragraphs"><p>new katraj tunnel accident</p></div>
दुर्देवी घटना! 'दुचाकी दुभाजकास धडकली; मागे बसलेला मुलगा ठार'; सोलापूर-पुणे महामार्गावर अपघात, आई-वडिलांचा हंबरडा..

या अपघातात चेतन मधुकर मोरे (वय १७, रा. गणेश चौक, आंबेगाव पठार, धनकवडी) याचा मृत्‍यू झाला असून, दुचाकीस्वार कृष्णा तानाजी मादगुडे (वय १८, रा. तांबाड, ता. भोर) हा जखमी झाला. याबाबत चेतनची आई मंगल (वय ३६) यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कृष्णा व चेतन हे २७ ऑक्टोबरला दुपारी नवीन कात्रज बोगद्यातून जात असताना त्‍यांची दुचाकी घसरली. यामध्‍ये चेतन गंभीर जखमी झाला अन् त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक युवराज शिंदे तपास करत आहेत.

<div class="paragraphs"><p>new katraj tunnel accident</p></div>
Accident News: वडिलांसोबत दुचाकीवरून जात होती; तेवढ्यात काळानं घात केला अन्..., २० वर्षीय लेकीनं जीव गमावला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com