esakal | 150 ते 200 फूट उंच कड्यावर पर्यटकांचे जीवघेणे स्टंट
sakal

बोलून बातमी शोधा

सिंहगड

सिंहगड : 150 ते 200 फूट उंच कड्यावर पर्यटकांचे जीवघेणे स्टंट

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी: सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद असताना प्रत्यक्षात मात्र वेगळेच चित्र दिसून येत आहे. वनसमीतीच्या कर्मचाऱ्यांच्या दुटप्पी भुमिकेमुळे अनेक 'वशिलेबाज' मोठ्या प्रमाणात सिंहगडावर जात असून तब्बल 150 ते 200 फूट उंच कड्यावर धोकादायक ठिकाणी उभे राहून तरुण-तरुणी जीवघेणे स्टंट करताना दिसत आहेत.तसेच मोडकळीस आलेल्या धोकादायक वाहनांतून जादा दर आकारुन पर्यटकांची वाहतुकही सुरू आहे.

हेही वाचा: गुन्हेगाराचा ४ दिवसांपूर्वीच खून, मृतदेह शनिवारी कालव्यात सापडला

नागरिकांची सुरक्षितता व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, धरण परिसर व गडकिल्ले आदी ठिकाणी संचारबंदी लागू केलेली आहे. या आदेशाला सिंहगड पायथ्याशी नाकाबंदीसाठी व गडावर बंदोबस्तासाठी असलेले वनसमीतीचे कर्मचारीच पायदळी तुडवत असल्याचे दिसून येत आहे. काहींना नाकाबंदीच्या ठिकाणावरुन परत पाठविले जाते तर काहींना 'सोईस्करपणे' गडावर जाऊ दिले जाते. शिवाय काही पर्यटकांना त्यांची वाहने बाजूला लावून संगणमताने प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहणातून गडावर पाठविण्यात येत आहे. संबंधित वाहतूकदार अडवणूक करत एका प्रवाशाकडून येण्याजाण्याचे मिळून 170 ते 150 रुपये उकळत आहेत.

हेही वाचा: सुखसागर नगर मधील महापालिकेचा दवाखाना रुग्णांसाठी ठरतोय संजीवनी

स्थानिकांच्या वाहनातून जे पर्यटक गडावर येतात त्यांना दरवाजा बंद करून बसलेले कर्मचारी आत प्रवेश देतात. चालत येणाऱ्या किंवा स्वतःच्या वाहनाने गडावर आलेल्या पर्यटकांची मात्र अडवणूक करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. तसेच गडावरील धोकादायक कड्यांवर जाऊन पर्यटक जीवघेणे स्टंट करत असताना त्याकडे मात्र या वनकर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

हेही वाचा: मित्राच्या मदतीनं लेकीनेच उकळली खंडणी; पाहा व्हिडिओ

आम्ही जगायचे कसे?......

काही नियम ठरवून सिंहगड पर्यटक व गडप्रेमींसाठी खुला करावा. आमच्या उपजीविकेसाठी दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. वनकर्मचाऱ्यांच्या संगणमताने अनेक पर्यटक सिंसगडावरील वाहन तळापर्यंत येतात. काहींनी तेथे खाद्यपदार्थ विक्री सुरू केली असल्याने पर्यटक पुढे येत नाहीत किंवा त्यांना येऊ दिले जात नाही. आमच्यावर अन्याय होत आहे. आमच्या जगण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सिंहगड किल्ला सर्वांसाठी खुला करावा अशी मागणी सिंहगडावरील रहिवाशांनी केली आहे.

"स्थानिक मनमानी करुन प्रवाशांची वाहतूक करत आहेत. कारवाई करण्यासाठी गेल्यानंतर वाहने पळवली जातात. काही कर्मचारीही यामध्ये सामील असल्याचे दिसून येत आहे. कोणालाही गडावर सोडू नयेत अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत."

- बाळासाहेब जिवडे, वनरक्षक, घेरा सिंहगड.

loading image
go to top