नाणेघाटात सोमवारपासून पर्यटकांसाठी असणार उपद्रव शुल्क

दत्ता म्हसकर
Sunday, 22 November 2020

ऐतिहासिक नाणेघाट, किल्ले जीवधन व चावंड येथे येणाऱ्या पर्यटककांना सोमवार (ता. २३) पासून उपद्रव व पार्किंग शुल्क द्यावे लागणार आहे. 

जुन्नर : ऐतिहासिक नाणेघाट, किल्ले जीवधन व चावंड येथे येणाऱ्या पर्यटककांना सोमवार (ता. २३) पासून उपद्रव व पार्किंग शुल्क द्यावे लागणार आहे. कोवीड १९ मुळे पर्यटनास बंदी असल्याने गेले नऊ महिने बंद असलेले हे शुल्क पुन्हा सुरू करण्यात येत आहे. 

जबाबदारी स्वीकारणारेच यशस्वी ठरतात; पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना मूलमंत्र

सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पर्यटकांकडून काटेकोर पालन व्हावे. गावांतील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा. या शुल्कातून जमा होणाऱ्या रकमेतून युवकांना येथील जैवविविधता जपण्यास व परिसर प्लॅस्टिक मुक्त ठेवण्यास मदत व्हावी हा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. येथे मद्यपानास बंदी राहणार असून अन्य पर्यटकांना त्रास होऊ नये यासाठी वनसमितीच्या मार्फत स्थानिक सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. 

जुन्नरचे वनपरीक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांनी सांगितले की, सोमवारपासून येथे पार्किंग व उपद्रव शुल्क आकारणीबाबत पुणे येथील मुख्य वनसंरक्षक सुजय दोडल, जुन्नरचे उपवनसंरक्षक जयरामे गौडा यांनी सुचना दिल्या आहेत. या शुल्काच्या माध्यमातून स्थानिक तरूणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न व्हावा असे सांगितले आहे.

यावेळी घाटघरच्या सरपंच अंजना लांडे, उपसरपंच बुद्धा बुळे, अध्यक्ष संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  चंदर शिंगाडे, पेसा अध्यक्ष चिमा शिंगाडे, वनपाल शशिकांत मडके, वनरक्षक रमेश खरमाळे, वनरक्षक सचिन कवटे, वनसेवक मारूती साबळे, चिंधा घोईरत, पोलीस पाटील शैला रावते, रमेश रावते, गणु डामसे, विठ्ठल रडे काळु लांडे, ढवळा मुंडे, साहेबराव बुळे , मनोज साबळे,अमोल साबळे, पोपट गंभीरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Corona Updates: दिवाळीनंतर कोरोनाचा प्रसार वाढला; 24 तासांत 45 हजारांपेक्षा जास्त रुग्ण

सरपंच व उपसरपंच यांनी उपद्रव शुल्क म्हणून स्वत:ची पावती फाडून कामाची सुरुवात केली. तसेच सर्वांनी नाणेघाट परीसरात भेट देऊन उपद्रव शुल्क आकारणी सुरक्षा रक्षक चौकी याची पाहणी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourists will be charged at Naneghat from Monday