Train travel from Pune is possible from Monday and reservation will also be given 120 days in advance
Train travel from Pune is possible from Monday and reservation will also be given 120 days in advance

पुण्यातून सोमवारपासून रेल्वे प्रवास शक्य: आरक्षणही 120 दिवस अगोदर मिळणार

पुणे : रेल्वेच्या सोमवारपासून (ता. 1 जून) 200 गाड्या देशातील प्रमुख शहरांतून सुरू होणार आहेत. त्यातील पाच गाड्या पुण्यात येतील तर, पुण्यातून पाटणासाठी रोज गाडी सुटेल. या गाड्यांचे आता 120 दिवस अगोदर आरक्षण करता येणार आहे. त्याला आजपासून सुरवात झाली. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा 


एक जूनपासून सुरू होणाऱया रेल्वे गाड्यांत महाराष्ट्रातंर्गत प्रवासासाठी तिकिट देण्यात येणार नसल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महाराष्ट्रात रेल्वे प्रवास शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच मुंबई- पुणेही रेल्वे प्रवास कोणाला करता येणार नाही.

शासनाच्या आदेशाचा विद्यार्थ्यांना फटका; गरवारे महाविद्यालयाचे २०० विद्यार्थी अकरावीत नापास

 मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि बांद्रा टर्मिनसवरून त्यातील 14 गाड्या सुटणार आहेत. भुवनेश्वर, दरभंगा, वाराणसी, गदग, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, जयपूर, पाटलीपूत्र आदींचा त्यात समावेश आहे. या मार्गावरील 14 गाड्या मुंबईलाही परतणार आहेत. तसेच पुण्यातून पुणे- पाटना ही गाडी एक जूनपासून सुरू होणार आहे. तसेच मुंबई - भुवनेश्वर कोनार्क एक्स्प्रेस, निजामुद्दीन- गोवा, मुंबई - हैदराबाद हुसेनसागर एक्सप्रेस, मुंबई- गदग आदी गाड्या पुण्यातून पुढे जाणार आहेत. 

पुण्यात हे काय चाललंय, रोज `एवढे` जण करताहेत आत्महत्या; ही आहेत कारणे...​​

या गाड्यांचे आरक्षण या पूर्वी 30 दिवस अगोदर करता येत होते. आता ही सुविधा 120 दिवसांपर्यंत वाढविण्यात आली आहे. या गाड्यांत फक्त पाकिटबंद वस्तू, खाण्यासाठी तयार असलेले भोजन, पाण्याच्या सीलबंद बॉटल्स, चहा, कॉफी यांची व्यवस्था व्हेंडरकडून किंवा पॅंट्रीमार्फत होणार आहे. तसेच सामान आणि पार्सलही बुक करण्याची व्यवस्था या गाड्यांत करण्यात आली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.

पुणेकरांना दिलासा! मिळकत कर भरण्याससाठी 'या' तारखेपर्यंंत मिळाली मुदतवाढ

मुंबईवरून एकूण 28 गाड्यांची वाहतूक होणार असून त्यातील 10 गाड्या पुण्यावरून जाणार आहेत. मात्र, या गाड्यांना पुणे- मुंबई किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही मार्गावरील प्रवासाचे तिकिट देता येणार नाही. तसेच महाराष्ट्रातंर्गत प्रवासही करता येणार नाही. 

पुण्यात मोठी दुर्घटना टळली; पावसाच्या तडाक्याने कोसळला ट्रान्सफाॅर्मर अन्...

रेल्वेतून प्रवास करण्यापूर्वी नियोजीत वेळेपूर्वी सुमारे 90 मिनिटे अगोदर प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर पोचावे, चेहऱयावर मास्क बंधनकारक आहे, असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे. पुणे रेल्वे स्थानकावर आरक्षणाच्या तीन खिडक्या सुरू करण्यात आल्या आहेत. सोशल डिन्स्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून प्रवाशांना आरक्षण मिळेल, असेही झंवर यांनी सांगितले. 
Video : पुण्यातील मार्केट यार्ड तब्बल ५० दिवसांनंतर सुरू; पहिल्या दिवशी एवढ्या...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com