esakal | पुणे-सोलापूर मार्गावर आठवड्यातून पाच वेळा धावणार रेल्वे

बोलून बातमी शोधा

Railway}

पुणे-सोलापूर मार्गावर आठवड्यातून पाच दिवस तर कोल्हापूर-नागपूर मार्गावर आठवड्यातून दोन वेळा विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने घेतला आहे. १ मार्चपासून या गाड्या सुरू होतील.

पुणे-सोलापूर मार्गावर आठवड्यातून पाच वेळा धावणार रेल्वे
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर-नागपूरसाठी दोन वेळा मिळणार सेवा
पुणे - पुणे-सोलापूर मार्गावर आठवड्यातून पाच दिवस तर कोल्हापूर-नागपूर मार्गावर आठवड्यातून दोन वेळा विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने घेतला आहे. १ मार्चपासून या गाड्या सुरू होतील. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सोलापूर-पुणे (गाडी क्र. ०११५८) गाडी सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी सोलापूरहून सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी निघेल आणि सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी पुण्यात पोचेल. पुणे-सोलापूर (गाडी क्र. ०११५७) शनिवार, रविवार वगळता रोज सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी पुण्यातून सुटेल आणि सोलापूरला रात्री १० वाजता पोचेल. ही गाडी दौंड, कुर्डुवाडी स्थानकांवर थांबेल.

गणेशभक्तांसाठी महत्त्वाची बातमी; थेऊरच्या 'श्री चिंतामणी' मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी बंद

कोल्हापूर-नागपूर (गाडी क्र. ०१४०४) १२ मार्चपासून दर सोमवार आणि शुक्रवारी कोल्हापूरवरून दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता ही गाडी नागपूरला पोचेल. नागपूर-कोल्हापूर (गाडी क्र. ०१४०३) दर मंगळवारी आणि शनिवारी नागपूरवरून दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजता कोल्हापूरला पोचेल. मिरज, सांगोला, पंढरपूर, कुर्डुवाडी, बार्शी, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, परभणी, पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा आणि अजनी स्थानकांवर थांबेल, अशी माहिती पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.

चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या; पानशेतमधील पीडीत कातकरी कुटुंबाची हाक

Edited By - Prashant Patil