सरकारने जाहीर केलेल्या दरानुसारच खासगी रुग्णालयात उपचार करा नाहीतर...; विभागीय आयुक्तांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मे 2020

रुग्णालयांमधील एकूण खाटांच्या 80 टक्के खाटा कोरोना आणि अन्य रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

une-news" target="_blank">पुणे : राज्य सरकारने कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी दर निश्चित केले असून, त्यानुसार खासगी रुग्णालयांनी आपल्या सेवा देणे बंधनकारक आहे. नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिला.

- पुण्यात कोरोनाचा धडाका सुरूच; सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्या दोनशेच्या पुढेच!

डॉ. म्हैसेकर यांनी कॉन्सिल हॉलमध्ये पुणे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह खासगी रुग्णालयांच्या व्यवस्थापनाची बैठक घेतली. याबाबत डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खासगी आणि धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत रुग्णालयांमधील एकूण खाटांच्या 80 टक्के खाटा कोरोना आणि अन्य रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

- पुणेकरांनो, महापालिकेच्या 'या' 9 रुग्णालयांत घ्या कोरोनाचे उपचार; तेही अगदी मोफत!

मेस्मा, आपत्कालीन व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायद्यांमधील तरतुदींच्या अनुषगांने खासगी रुग्णालयांनी राज्य सरकारच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. या निर्णयाला खासगी रुग्णालयांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा. रुग्णालयांच्या अडचणीसंदर्भात निश्चितपणे मार्ग काढण्यात येईल. खासगी रुग्णालय आणि प्रशासन एकत्रित काम करून पुण्याला कोरोनामुक्त करू. प्रत्येक रुग्णाला उपचार मिळणे आवश्यक असून, ती आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे, आपण मिळून ही जबाबदारी निश्चितपणे पार पाडू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- विद्यार्थी-पालकांसाठी आनंदाची बातमी; शुल्कवाढीबाबत पुणे विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय!

या बैठकीला जिल्हाधिकारी नवल किशोर राम,पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, आरोग्य विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, डॉ. दिलीप कदम आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Treat in a private hospital but at a rate set by the government says Pune Divisional Commissioner